Mumbai Coronavirus Cases : गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे चित्र आहे. बुधवारच्या तुलनेत गुरुवारी मुंबईमध्ये नव्या रुग्णांची संख्या घटली आहे. दिलासादायक बाब म्हणजे, नव्या रुग्णांपेक्षा तीनपट रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. बीएमसीने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी मुंबईत 5,708 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 15 हजार 440 जणांनी कोरोनावर मात केली आहे.  मागील २४ तासांत मुंबईत 12 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

सध्या मुंबईतील 44 इमारती सील करण्यात आल्या आहेत. तसंच आज नव्याने सापडलेल्या 5,708 रुग्णांपैकी 550 रुग्णांनाच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 4,795 रुग्णांमध्ये कोणताही लक्षणेही नाहीत.  आल्याने 38 हजार 093 बेड्सपैकी केवळ 4,857 बेड वापरात आहेत.  सध्या मुंबईचा रिकव्हरी रेट वाढून 96 टक्के इतका आहे.  

 मुंबईतील कोरोनारुग्ण संख्येच्या आकडेवारीवर एक नजर...

दिनांक मुंबईतील रुग्णसंख्या
1 जानेवारी 6347
2 जानेवारी 8063
3 जानेवारी 8082
4 जानेवारी 10860
5 जानेवारी 15166
6 जानेवारी 20181
7 जानेवारी 20971
8 जानेवारी 20,318
9 जानेवारी 19474
10 जानेवारी 13,648
11 जानेवारी 11,647
12 जानेवारी 16,420
13 जानेवारी 13, 702
14 जानेवारी 11, 317
15 जानेवारी 10, 661
16 जानेवारी 7, 895
17 जानेवारी 5, 956
18 जानेवारी 6, 149
19 जानेवारी 6, 032
20 जानेवारी 5,708

इतर बातम्या : Mumbai School : मुंबईत सोमवारपासून नाही तर 'या' तारखेपासून सुरु होणार शाळाMumbai Local Mega Block : ठाणे-दिवा दरम्यान शेवटचे 2 मेगाब्लॉक, नंतरच पाचवी सहावी मार्गिका सुरू, मध्य रेल्वेची माहितीMumbai–Pune Expressway : मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वरुन दररोज दहा हजारापेक्षा जास्त वाहने टोल न देता करतात प्रवास, माहिती आयुक्तांच्या आदेशावरुन प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीत MSRDC चा दावा