मुंबई : येत्या तीन महिन्यात मुंबईतील रेल्वे स्थानकांवर महिन्यात दहशतवादी हल्ल्याचा इशारा भारतीय गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे. या इशाऱ्यानंतर सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हा अलर्ट जारी करण्यात आला आहे.


दशतवादी समुद्रमार्गे मुंबईत घुसण्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड समुद्र किनाऱ्यावरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात हायअलर्ट असल्याने पोलीस यंत्रणा सतर्क आहेत.



दररोज लाखो मुंबईकर लोकल ट्रेनने प्रवास करतात. हल्ल्याची सूचना मिळाल्यानंतर रेल्वे प्रशासनाकडून सुरक्षाव्यवस्था वाढवण्यात आली. तसंच संशयास्पद वस्तू किंवा व्यक्ती दिसल्यास त्यांना त्याब्यात घेऊन चौकशी करण्याचा आदेश देण्यात आला आहे.

रायगडच्या आपटा गावात वस्तीच्या एसटी बसमध्ये काल (22 जानेवारी) आयईडी सापडल्याने एकच खळबळ उडाली होती. बसमध्ये बॉम्ब कोणी ठेवला याचा तपास सुरु आहे.