मुंबईत सैराट फेम आर्चीच्या हस्ते ध्वजारोहण
एबीपी माझा वेब टीम | 15 Aug 2016 03:31 AM (IST)
मुंबई : अवघ्या देशभरात 70 व्या स्वातंत्र्यदिनाचा उत्साह पाहायला मिळत आहे. मुंबईतही सैराट फेम आर्ची म्हणजेच अभिनेत्री रिंकू राजगुरुच्या हस्ते तिरंगा फडकवण्यात आला. मुंबईतील भांडूपमध्ये स्वातंत्र्यदिनानिमित्त रात्री बारा वाजता ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. अनेक समारंभात प्रमुख पाहुणी म्हणून उपस्थिती लावणाऱ्या रिंकू राजगुरुने या ध्वजवंदनालाही हजेरी लावली. भांडुपमध्ये मनसेचे माजी आमदार शिशिर शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली ध्वजवंदनाचा कार्यक्रम पार पाडला. सैराटची जनसामान्यांतली क्रेझ पाहता यंदाचं ध्वजारोहण रिंकू राजगुरुच्या हस्ते करण्यात आलं.