हेडलाईन्स :

 

1. 70 व्या स्वातंत्र्यदिनाचा देशभर उत्साह, केंद्रीय गृहमंत्र्यांच्या निवासस्थानी ध्वजारोहण, पंतप्रधान लाल किल्ल्यावर तिरंगा फडकला

 

2. महिला आणि मुलांवर अत्याचार करणाऱ्यावर सक्तीनं कारवाई करा, स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींचा संदेश, दहशतवादाविरोधात एकत्र येण्याचं आवाहन

 
3. भांडुपमध्ये रात्री 12 वाजता सैराट फेम आर्चीच्या हस्ते ध्वजारोहण, मनसेचे शिशिर शिंदे यांच्याकडून कार्यक्रमाचं आयोजन

 

4. स्वातंत्र्यदिनानिमित्त बीएसएनएलची बंपर ऑफर, दर रविवारी लँडलाईनवरुन मोफत बोला, दूरसंचार मंत्री मनोज सिन्हांची माहिती

 

5. पुढच्या आर्थिक वर्षापासून स्वतंत्र रेल्वे बजेट नाही, 92 वर्षांपासूनच्या परंपरेला केंद्राचा पूर्णविराम, केंद्रीय अर्थसंकल्पातच रेल्वेसाठी तरतूद

 
6. 13 दिवसांपासून सुरु असलेलं सावित्रीतलं शोधकार्य थांबवलं, तवेरासह आणखी 2 मृतदेह सापडले, 14 मृतदेहांचा थांगपत्ता नाहीच

 
7. वसईत चौघांचा बुडून मृत्यू, तुंगारेश्वर धबधब्यात तिघांनी जीव गमावला, तर चुळणे तलावात एकाचा मृत्यू

 
8. पंढरपुरात शिवसेनेची गुंडगिरी, मंदिर व्यवस्थापकाच्या तोंडाला काळं फासलं, शिपायांच्या हस्ते खोतकरांचं स्वागत केल्यामुळं सूड उगवल्याची चर्चा

 
9. शेतातला माल थेट विधानसभेच्या अंगणात, सकाळी मुख्यमंत्र्यांकडून बक्कळ खरेदी, तर संध्याकाळी तिरंगा रॅलीत मुख्यमंत्र्यांची बुलेटवारी

 
10. भारताची जिम्नॅस्ट दीपा कर्माकरचं रिओ ऑलिम्पिकमधलं कांस्यपदक थोडक्यात हुकलं, व्हॉल्ट प्रकारात दीपा चौथ्या स्थानावर