अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई | 30 Jun 2018 01:35 PM (IST)
मुंबईत मध्य रेल्वेवरील कुर्ला स्टेशनवर महाराष्ट्र सुरक्षा बल आणि आरपीएफच्या जवानांनी आपला जीव धोक्यात घालून महिला मोबाईल चोराला जेरबंद केलं.
मुंबई : महाराष्ट्र सुरक्षा बल आणि आरपीएफच्या जवानांनी आपला जीव धोक्यात घालून महिला मोबाईल चोराला जेरबंद केलं. मुंबईत मध्य रेल्वेवरील कुर्ला स्टेशनवर हा प्रकार घडला. कुर्ला स्टेशनवर फलाट क्रमांक एकवर एक महिला काल लोकलमधून उतरली. त्यावेळी महिला प्रवाशाच्या हातातला मोबाईल हिसकावून आरोपी तरुणी पळाली. हे पाहताच महाराष्ट्र सुरक्षा बल आणि आरपीएफच्या महिला आणि पुरुष कर्मचाऱ्यांनी तिचा पळत पाठलाग केला. मोबाईल चोरणाऱ्या तरुणीने धावत रेल्वे रुळावर झेप घेतली. तिच्या मागे या जवानांनीही रुळावर उडी घेतली आणि तिला रंगेहाथ जेरबंद केलं. मोबाईल चोरणारी जैनब पठाण ही अट्टल चोर आहे. तिला लोहमार्ग पोलिसांच्या हवाली करण्यात आलं असून सध्या तिला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.