मुंबई : मुंबईचे नवे पोलिस आयुक्त म्हणून 1985 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी सुबोध जयस्वाल यांच्या नावाची घोषणा झाली आहे. आज ते पदभार स्वीकारणार आहेत. तर राज्याच्या महासंचालकपदी दत्ता पडसलगीकर यांची वर्णी लागली आहे.


दुसरीकडे राज्याचे पोलिस महासंचालक सतीश माथूर आज सेवानिवृत्त झाले. यावेळी पोलिस दलामार्फत मोठ्या आदराने आणि दिमाखदार सोहळ्याने त्यांना निरोप देण्यात आला. फुलाने सजवलेल्या एका गाडीतून माथूर यांची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी पोलिसांच्या बँड पथकाने वादनही केलं.

कोण होतं शर्यतीत?

1. सुबोध जयस्वाल, 1985 बॅच आयपीएस
सध्याची पोस्टिंग - वरिष्ठ RAW अधिकारी

2. संजय बर्वे, 1987 बॅच आयपीएस
सध्याची पोस्टिंग - राज्य गुप्तचर आयुक्त

3. परमबीर सिंह, 1988 बॅच आयपीएस
सध्याची पोस्टिंग - ठाणे पोलिस आयुक्त

4. रश्मी शुक्ला, 1988 बॅच आयपीएस
सध्याची पोस्टिंग - पुणे पोलिस आयुक्त

कोण आहेत सुबोध जयस्वाल?

- सुबोध जयस्वाल हे 1985 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.

- ते सध्या भारतीय गुप्तचर यंत्रणा 'रॉ'मध्ये वरिष्ठ पदावर आहेत.

- सुबोध जयस्वाल हे तेलगी स्टॅम्प पेपर घोटाळ्याचे तपास अधिकारी होते.

- सोबतच महाराष्ट्राच्या नक्षलग्रस्त परिसरात त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड चांगला होता.

- 2006 मुंबई बॉम्बस्फोटाच्या तपास पथकात होते.

- तसंच मुंबई पोलिसात अतिरिक्त पोलिस आयुक्त म्हणूनही त्यांन काम केलं आहे.