मुंबई : मुंबईत दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाचा परिणाम ठिकठिकाणी दिसत आहे. चांदिवलीच्या संघर्षनगरमध्ये रस्ता खचला असून या दुर्घटनेत काही कामगारही वाहून गेल्याची भीती वर्तवण्यात येत आहे.


साकीनाका पोलिस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. सुरक्षेचा उपाय म्हणून रस्त्याशेजारील इमारती रिकाम्या करुन रहिवाशांना स्थलांतरित करण्याचं काम सुरु आहे.

संघर्षनगरमध्ये एसआरएच्या इमारती आहेत. तसंच अनेक प्रकल्पग्रस्त इथे राहत आहेत. इथे इमारतीचं बांधकाम सुरु होतं. तिथे कामगार राहत होते. काल रात्री हा रस्ता खचला आणि या दुर्घटनेत कामगार वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे.