मुख्य रस्त्यांवरील स्थिती काय?
- वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर पाणी साचल्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी
- इस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर अमर महल जंक्शनजवळ एस जी बर्वे रोड, व्हीएन पुरव रोडवर पाणी साचलं, माटुंग्याहून दक्षिण मुंबईकडे जाणारी वाहतूक वडाळ्याच्या दिशेने वळवली
- जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड (जेव्हीएलआर) जवळपास संपूर्ण मार्गावर पाणी साचलं
- खार-वांद्रे एसव्ही रोडवर पाणीच पाणी
- हिंदमाताजवळ पाणी साचल्याने वाहतुकीचा बोजवारा
- अंधेरी-कुर्ला रोडच्या सुरुवातीला पाणी साचल्याने वाहतूक मंदावली
- मुंबईतील सात रस्ता परिसरातील पेट्रोल पंपजवळ झाड पडल्याने वाहतुकीस अडथळा
- सिद्धीविनायक मंदिर परिसरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं
- सायन ते दादर दरम्यान रस्ते वाहतूक ठप्प
- सांताक्रुझ-कुर्ला लिंक रोड (एससीएलआर) वर मोठी वाहतूक कोंडी
- वरळी सी फेसच्या दिशेने रस्त्यावर ट्राफिक जॅम
- भायखळा स्टेशनजवळ राणीची बाग बस स्टॉपच्या दिशेने पॅलेस सिनेमाजवळ पाणी साचलं
रस्त्यावर कुठेही अडकला असल्यास 100 नंबरवर कॉल करा किंवा ट्विटरवरुन कळवा, मुंबई पोलिसांचं आवाहन
https://twitter.com/MumbaiPolice/status/902447883848384512
लोकल रेल्वेची स्थिती काय?
हार्बर आणि मध्य रेल्वेची वाहतूक पूर्णपणे बंद
पश्चिम रेल्वेवर लोअर परेल आणि एल्फिन्स्टन स्टेशन दरम्यान रुळावर झाड पडलं, स्लो मार्गावरील रेल्वे वाहतूक फास्ट ट्रॅकवर
बहुतांश कार्यालयांना सुट्टी
पावसामुळे मुंबईतील अनेक कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे किंवा काही जणांना हाफ डे देण्यात आला आहे. मात्र ऑफिसला आलेल्या कर्मचाऱ्यांना घरी परतण्यासाठी लोकलच नसल्यामुळे अनेकजण स्टेशनवर अडकले आहेत.
शाळा बंद
दुपारच्या सत्रातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. तर महापालिकेच्या सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
सायनजवळ रेल्वे रुळांवर, तर कुर्ला स्टेशनबाहेर गुडघाभर पाणी साचलं आहे. ट्रेन नसल्यामुळे प्रवासी स्टेशनबाहेर आले असून परिसरात प्रवाशांची मोठी गर्दी जमा झाली आहे.
गणेश मंडळांचा विद्युत पुरवठा बंद करा
पाणी साचलेल्या भागातील गणेश मंडपांचा वीजपुरवठा बंद करा असा आदेश गणेश मंडळांना सार्वजनिक गणेशोत्सव समितीने दिले आहेत. शॉर्ट सर्किटसारख्या दुर्घटना टाळण्यासाठी खबरदारी म्हणून सूचना जारी करण्यात आली आहे.
तरच घराबाहेर पडा
आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा, आपत्कालीन परिस्थितीत 1916 वर कॉल करा, असं आवाहन युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुंबईकरांना केलं आहे. मुंबईत एक तासामध्ये 52 मि.मी. पेक्षा जास्त पाऊस झाला असून पुढील 24 तासांमध्ये अधिक पाऊस अपेक्षित असल्याचंही ते म्हणाले.
मुंबईतील सर्व पंपिंग स्टेशन्स कार्यरत आहेत. परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावाही आदित्य ठाकरेंनी केला आहे.