UPDATE : बंद केलेल्या एक्स्प्रेस वेवरुन रात्री 10 वाजता छोटी वाहने मुंबईच्या दिशेने सोडली, जुना महामार्गही खुला, मात्र अवजड वाहने अजूनही थांबवली 

BREAKING : पावसामुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर बंद होणार

UPDATE : केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनीही मुंबईतील पावसाबाबत मुख्यमंत्र्यांकडून माहिती घेतली, सर्वोतपरी मदतीचं आश्वासन दिलं

https://twitter.com/rajnathsingh/status/902515896429666313

https://twitter.com/rajnathsingh/status/902515707799257089

UPDATE : पावसात अडकलेल्यांसाठी सिद्धीविनायक मंदिरात राहण्याची सोय, मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांची माहिती

UPDATE : महाराष्ट्रात पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी मदत करेल, पंतप्रधानांकडून मदतीची हमी

UPDATE : मुसळधार पावसामुळे ऑफिसमध्ये गेलेल्या कर्मचाऱ्यांचा खोळंबा, जवळपास 30 हजार जण कार्यालयांतच अडकले

UPDATE : मुसळधार पावसामुळे मुंबईतील काही भागात वीज गेली; दादर, सायन, परळ भागात वीजपुरवठा खंडित

UPDATE : कमी दृश्यमानतेमुळे रद्द केलेली मुंबई विमानतळावरील उड्डाणं पुन्हा सुरु

मुंबईतील पावसाची आकडेवारी -
परिसर- गेले 24 तास/ गेला एक तास
अंधेरी - 270 मिमी/ 92 मिमी
बीकेसी - 204 मिमी/ 54 मिमी
वांद्रे पश्चिम - 247 मिमी/ 52 मिमी
भांडुप - 251 मिमी/ 58 मिमी
चेंबुर - 214 मिमी/ 62 मिमी
कफ परेड - 123 मिमी/ 10 मिमी
दहिसर - 190 मिमी/ 40 मिमी
घाटकोपर पूर्व - 221 मिमी/ 61 मिमी
गोरेगाव - 193 मिमी/ 65 मिमी
परळ - 285 मिमी/ 40 मिमी
कुर्ला - 300 मिमी/ 92 मिमी

राज्यभरातील पावसाची आकडेवारी -
अकोला- 66.2 मिमी
अमरावती- 15.6 मिमी
गोंदिया- 33.8 मिमी
वर्धा- 24.6 मिमी
नागपूर- 17.4 मिमी
पुणे- 18.8 मिमी
कोल्हापूर- 34 मिमी

'बेस्ट'तर्फे अतिरिक्त बसची सुविधा -
सायन ते मुलुंड चेकनाका - बस क्रमांक 302 - 10 बस
बॅकबे ते सांताक्रुझ - बस क्रमांक 83 - 12 बस
वडाळा ते सीएसएमटी - बस क्रमांक 10 - 2 बस
देवनार ते सीएसएमटी - बस क्रमांक C50 - 2 बस
मुंबई सेंट्रल ते टाटा पॉवर - बस क्रमांक 351 - 3 बस
हुतात्मा चौक ते अंधेरी - बस क्रमांक 84 - 2 बस
सांताक्रुझ - बस क्रमांक 28 - 2 बस
आणिक आगार ते सीएसएमटी - बस क्रमांक C6 - 4 बस⁠⁠⁠⁠

VIDEO : सायन-माटुंगादरम्यान लोकल उभी, ट्रेनमध्ये लाईट-फॅन बंद, भर पावसात प्रवासी उतरले

https://twitter.com/abpmajhatv/status/902491500948316161

VIDEO : ट्रॅकवरच नव्हे तर प्लॅटफॉर्मपर्यंत पाणी पोहोचलं, सायन स्टेशनवरील परिस्थिती बिकट

https://twitter.com/abpmajhatv/status/902490240455122944

UPDATE : भर पावसात पोलिसांचं काम पाहा, एक कडक सॅल्युट ठोकाल!

https://twitter.com/abpmajhatv/status/902486018435178496

VIDEO : पावसाचा जोर वाढला, जीव धोक्यात घालून रखडलेल्या लोकलमधून उतरण्याचा प्रयत्न, भीषण वास्तव

https://twitter.com/abpmajhatv/status/902484307444244482

UPDATE : मुंबईत पावसाचा जोर वाढला, येत्या काही तासात आणखी पाऊस जोर धरण्याचा अंदाज

UPDATE : सायन आणि माटुंगा दरम्यान ट्रॅकवरील पाणी वाढण्यास सुरुवात

https://twitter.com/abpmajhatv/status/902478456423817216

VIDEO : शीव स्टेशनवर ट्रॅकवर गुडघाभर पाणी, मुंबईतील पावसाचं भीषण चित्र दाखवणारा व्हिडीओ -

https://twitter.com/abpmajhatv/status/902477289241186307

UPDATE : पुढील चार तासात पावसाचा जोर पुन्हा वाढणार, हवामानाच्या अंदाजानंतर मंत्रालय आणि मुंबईतील सरकारी कार्यालयांना दुपारनंतर सुट्टी

https://twitter.com/abpmajhatv/status/902471338996019202

UPDATE : वांद्रे-वरळी सी-लिंकचा दक्षिण मुंबईकडे जाणारा मार्ग काही वेळ वाहतुकीसाठी बंद, वाहतूक कोंडीमुळे निर्णय, मुंबई पोलिसांची माहिती

https://twitter.com/MumbaiPolice/status/902459973795328000

https://twitter.com/ndmaindia/status/902453608918036481

UPDATE : सीएसटी ते ठाणे चारही मार्गावरील रेल्वे वाहतूक स्थगित करण्यात आलेली आहे - मध्य रेल्वे घोषणा

UPDATE : मुंबई आणि उपनगरात गेल्या तासाभरात 70 मिमी, तर सकाळी 8.30 वाजल्यापासून 100 मिमीहून अधिक पावसाची नोंद

https://twitter.com/ANI/status/902451609766027264

UPDATE : आपत्कालीन स्थितीत मुंबई महापालिकेशी संपर्क साधण्यासाठी हेल्पलाईन नंबर - 1916

UPDATE : अत्यंत गरजेचं असेल तरच घराबाहेर किंवा ऑफिसबाहेर पडा, आदित्य ठाकरेंचं मुंबईकरांना आवाहन

https://twitter.com/AUThackeray/status/902449306489077760

UPDATE : रस्त्यावर कुठेही अडकला असल्यास 100 नंबरवर कॉल करा किंवा ट्विटरवरुन कळवा, मुंबई पोलिसांचं आवाहन

https://twitter.com/MumbaiPolice/status/902447883848384512

UPDATE : परेलच्या केईएम रुग्णालयात पाणी घुसलं

https://twitter.com/ANI/status/902447046858125316

UPDATE : मुंबईत तुफान पाऊस, परेलच्या केईएम रुग्णालयात पाणी घुसलं

https://twitter.com/abpmajhatv/status/902446897897418753

UPDATE : हार्बर रेल्वेवरील वाशी ते सीएसटी ट्रेन रद्द, पनवेल ते वाशीपर्यंत लोकल सुरु

UPDATE :अमर महल, एस जी बर्वे रोड, व्हीएन पुरव रोडवर पाणी साचलं, माटुंग्याहून दक्षिण मुंबईकडे जाणारी वाहतूक वडाळ्याच्या दिशेने वळवली

UPDATE : 'या' रस्त्यांवरुन जाणं टाळा :

https://twitter.com/abpmajhatv/status/902445888055910400

https://twitter.com/abpmajhatv/status/902443160936226816

UPDATE : महापालिकेच्या सर्व शाळांना मुसळधार पावसामुळे सुट्टी जाहीर

UPDATE : मुंबईच्या डबेवाल्यांची डबे पोहोचवण्याची सेवा विस्कळीत, पाणी भरल्यामुळे अडथळे



UPDATE : हार्बर आणि सेंट्रल रेल्वे पूर्णपणे ठप्प, पश्चिम रेल्वे विस्कळीत

UPDATE : लोअर परेल आणि एल्फिन्स्टन स्टेशन दरम्यान रुळावर झाड पडलं, स्लो मार्गावरील रेल्वे वाहतूक फास्ट ट्रॅकवर



UPDATE : एनडीआरएफच्या 3 टीम मुंबईत तयार, पुण्याहून आणखी 2 टीम रवाना

https://twitter.com/ANI/status/902437592355897344

VIDEO : मुंबईसह उपनगरांमध्ये पावसानं झोडपलं, लालबाग, हिंदमाता, अंधेरीत पाणी साचलं

https://twitter.com/abpmajhatv/status/902438424535195648

UPDATE : पुढील सूचनेपर्यंत मध्य रेल्वेवरील वाहतूक ठप्प, CST स्टेशनवर अनाऊन्समेंट, दोन्ही बाजूच्या लोकल बंद

PHOTO : मुंबईत कोणत्या रस्त्यांवर पाणी साचलं?

https://twitter.com/abpmajhatv/status/902437921709367296

UPDATE : पावसामुळे मुंबईची चहूबाजूंनी नाकेबंदी, पुण्याहून NDRF च्या दोन तुकड्या मागवल्या

UPDATE : मुंबईत तुफान पाऊस, मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प

UPDATE : सायन रेल्वे स्टेशनजवळील ट्रॅकवर पाणी साचलं

https://twitter.com/Marathi_Rash/status/902436173758517252

UPDATE : पावसामुळे मुंबईतील अनेक कार्यालयांना सुट्टी, मात्र ऑफिसला आलेल्या कर्मचाऱ्यांना घरी परतण्यासाठी लोकलच नाहीत, अनेकजण स्टेशनवर अडकले

UPDATE : हार्बर रेल्वे पूर्णपणे बंद, मध्य रेल्वेवर अत्यंत धीम्या गतीने वाहतूक, तर पश्चिम रेल्वेही विस्कळीत

UPDATE : कुर्ला स्टेशनबाहेर गुडघाभर पाणी, ट्रेन नसल्यामुळे प्रवासी स्टेशनबाहेर आले,परिसरात प्रवाशांची मोठी गर्दी

https://twitter.com/abpmajhatv/status/902433803108356097

UPDATE : तुफान पावसाने रस्त्यांना नद्यांचं रुप, दादरमधील पारसी कॉलनीत गुडघाभर पाणी

https://twitter.com/abpmajhatv/status/902432988775964676

UPDATE : सांताक्रुझ भागात गेल्या 3 तासात तब्बल 87 मिमी पावसाची नोंद

UPDATE : कुर्ला स्टेशनवर 11.52 ची डोंबवली लोकल अद्याप आलीच नाही, मात्र रेल्वेकडून लोकल येत असल्याची केवळ अनाऊन्समेंट, तासाभरापासून लोकल नाहीच

UPDATE : पाणी साचलेल्या भागातील गणेश मंडपांचा वीजपुरवठा बंद करा, गणेश मंडळांना सार्वजनिक गणेशोत्सव समितीचा आदेश, शॉर्ट सर्किटसारख्या दुर्घटना टाळण्यासाठी खबरदारी

https://twitter.com/ANI/status/902430496906371072

UPDATE : आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा, आपत्कालीन परिस्थितीत 1916 वर कॉल करा, आदित्य ठाकरेंचं मुंबईकरांना आवाहन

https://twitter.com/AUThackeray/status/902428713270292480

https://twitter.com/AUThackeray/status/902428713270292480

https://twitter.com/AUThackeray/status/902428362622283776

https://twitter.com/AUThackeray/status/902427619110641665

UPDATE : चर्चगेट जंक्शनजवळ झाड पडल्याने ट्राफिक, तर दादरमध्ये पाणी साचल्याने ट्राफिक

https://twitter.com/MumbaiPolice/status/902427837000368128

UPDATE : मुंबईतील सात रस्ता परिसरातील पेट्रोल पंपजवळ झाड पडल्याने वाहतुकीस अडथळा

https://twitter.com/MumbaiPolice/status/902426529551998978

UPDATE : मुसळधार पावसामुळे मुंबईतील दुपारच्या सत्रातील शाळा बंद

UPDATE : सिद्धीविनायक मंदिर परिसरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं

https://twitter.com/ashokepandit/status/902402229486964736

UPDATE : वडाळ्यातील काही भागात पाणी साचलं

UPDATE : मुंबईत पावसामुळे रस्ते, रेल्वे वाहतुकीचा खोळंबा, तांत्रिक अडचणींमुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प



UPDATE : मुंबईत मुसळधार पाऊस, पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प

UPDATE : मुंबईतील वरळी, लालबाग, कुर्ला बस डेपो जंक्शन, एलबीएस रोड, कुर्ला वेस्ट या भागात पाणी साचलं

UPDATE : परेलमधील हिंदमाता भागात पाणी साचलं

https://twitter.com/ANI/status/902400333036494849

मुंबईसह उपनगरात रात्रीपासून जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. मुसळधार पावसाने विमानांची उड्डाणंही 30 ते 40 मिनिटं उशिरानं होतं आहेत.

दरम्यान, पुढच्या 24 तासात राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मुंबईसह कोकण किनारपट्टी, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर मराठवाड्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज आहे.