मुंबई : वाहनांच्या अग्निकांडांमागे एका महाभयंकर प्राण्याचा हात आहे.. हा हात कोणत्याही माणसाचा नाही, तर एका प्राण्याचा आहे. आणि त्याचं नाव आहे... उंदीर. मुंबईत अग्निशमन दलानं केलेल्या अभ्यासामध्ये हा दावा करण्यात आला आहे.
पार्किंगमध्ये लावलेली कार ही उंदरांसाठी आश्रयाची जागा असते. विशेषतः पिल्लांना जन्म देण्यासाठी उत्तम जागा. कारण इथं उष्णताही असते आणि खाणंही. इंजिनातल्या प्लॅस्टिकच्या वायरी उंदरं कुरतडतात आणि तिथेच पहिली ठिणगी पडते.
मुख्य अग्निशमन अधिकारी प्रभात रहांगदळे यांनी वाहनचालकांना गाडी वारंवार चेक करण्याचं आवाहन केलं आहे. त्याचप्रमाणे शक्यतो कचऱ्याजवळ कार पार्क न करण्याचा सल्लाही दिला आहे.
2014-15 मध्ये 239 गाड्या खाक झाल्या
2015-16 मध्ये 262 गाड्यांचा कोळसा झाला
2016-17 मध्ये 287 गाड्या आगीत भस्मसात झाल्या
तर एप्रिल 2017 पासून जुलैपर्यंत 72 गाड्यांना आग लागली
यातल्या 410 गाड्या पेट्रोल होत्या, 216 गाड्या डिझेल होत्या, तर 175 गाड्या सीएनजी होत्या.
म्हणून आपण जिथं गाडी पार्क करत, तिथे उंदिर आहेत का? आपल्या गाडीची नियमित चाचणी करता का? आणि तुमच्या गाडीच्या वायर्स उंदरांनी कुरतडलेल्या तर नाहीत ना? याची नक्की खातरजमा करा.
वाहनांच्या अग्निकांडाला माणूस नाही... 'हा' जबाबदार!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
22 Jul 2017 06:15 PM (IST)
वाहनांच्या अग्निकांडांमागे एका महाभयंकर प्राण्याचा हात आहे.. हा हात कोणत्याही माणसाचा नाही, तर एका प्राण्याचा आहे. आणि त्याचं नाव आहे... उंदीर. मुंबईत अग्निशमन दलानं केलेल्या अभ्यासामध्ये हा दावा करण्यात आला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -