Mumbai Rape Case : बलात्कार हा एका असहाय महिलेच्या आत्म्यावर आघात करत असल्यानं, तो हत्येपेक्षाही भयंकर असल्याचं निरीक्षण विशेष पोक्सो न्यायालयानं नोंदवलं आहे. एका बलात्कार प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान, न्यायालयानं आपलं मत नोंदवत निकाल जाहीर केला. याप्रकरणी न्यायालयानं एका 28 वर्षीय तरुणाला 15 वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्काराच्या प्रयत्नासाठी दोषी ठरवून 10 वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. दरम्यान, 2012 मध्ये 15 वर्षांच्या मतिमंद मुलीवर बलात्काराचा प्रयत्न करण्यात आला होता. याप्रकरणातील दुसऱ्या आरोपीचा खटला सुरु असतानाच मृत्यू झाला. 


"पीडितेकडून सादर करण्यात आलेले पुरावे विश्वासार्ह आहेत. आरोपींनी दुष्कर्म करण्याच्या हेतूनचं पीडितेला एका निर्जन ठिकाणी नेलं", असं विशेष पोक्सो कोर्टाचे न्यायाधीश एच. सी. शेंडे म्हणाले.


न्यायालयानं म्हटलं की, हे प्रकरण चुकीच्या पद्धतीनं मांडण्यात आलं आहे. पीडितेनं आरोपींची ओळख पटवली आहे. बचाव पक्षानं युक्तीवाद करताना म्हटलं होतं की, पीडितेनं आरोपींची खोटी ओळख पटवली आहे. आरोपी बचाव पक्षाचे मित्र आहेत. त्यामुळे त्यांना खोट्या पद्धतीनं गोवण्यात आल्याचा युक्तीवाद बचाव पक्षानं केला होता. मात्र न्यायालयानं बचाव पक्षाच्या युक्तिवादाचं खंडन केलं. आरोपी मुलाच्या ओळखीचे आहेत, असं न्यायालयानं सांगितलं. "मतिमंद असूनही पीडितेनं खरं प्रतिपादन केलं आणि सध्याच्या आरोपीला हल्लेखोर म्हणून ओळखलं, त्यामुळे हयात नसलेल्या संशयित आरोपीविरुद्धही पुरावे सादर केले गेले," असं न्यायालयानं म्हटलं आहे. 


पीडित मुलीच्या आईनं लैंगिक अत्याचाराची माहिती पोलिसांना दिली होती. आईनं सांगितले होतं की, तिचे भाऊ रोज शाळेत जातात, मात्र प्रकृतीमुळे मुलगी घरीच असते. पुढे बोलताना आईनं सांगितलं होतं की, 4 सप्टेंबर 2015 रोजी ती कामावरून परतल्यानंतर तिला मुलीच्या वागण्यात बदल झाल्याचं लक्षात आलं. त्यावरुन तिला संशय आला. त्यामुळं आईनं मुलीला विश्वासात घेऊन तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. काही वेळानं मुलीनं तिच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत आईला सांगितलं. तिने आईला सांगितलं की, आरोपीनं तिला 10 रुपयांचं आमिष दाखवून एका निर्जन स्थळी नेलं आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. यापूर्वीही असा प्रकार घडल्याचं मुलीनं आईला सांगितलं. आईनं तात्काळ पोलीस स्थानकात धाव घेत आरोपींविरोधात एफआयआर दाखल केली. त्यानंतर आरोपींना अटक करण्यात आली.


महत्त्वाच्या इतर बातम्या :