Mumbai Rain news: राज्यभरात मान्सूनच्या पावसाने पुनरागमन केल्यानंतर मुंबईत जोरदार पाऊस सुरु आहे. रविवारी रात्रीपासून मुंबई आणि उपनगर परिसरात जोरदार पाऊस सुरु आहे. मंगळवारी पावसाने (Rain Updates) थोडीशी विश्रांती घेतली असली तरी ठराविक अंतराने पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. या जोरदार पावसामुळे मुंबईतील पहिला तलाव भरला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) अखत्यारितील प्रमुख कृत्रिम तलावांपैकी एक असणारा पवई तलाव (Powai Lake) आज सकाळी सुमारे सहा वाजता भरून वाहू लागला आहे. या तलावाची साठवण क्षमता 545 कोटी लिटर (5.45 अब्ज लिटर) आहे. येथील पाणी पिण्यायोग्य नसून मुख्यतः औद्योगिक उपयोगासाठी (MIDC) तसेच आरे दूध संकुलातील अन्य अपेय कारणांसाठी वापरले जाते. (Mumbai Heavy Rain)
गेल्या दोन दिवसांतील सततच्या मुसळधार पावसामुळे तलावाच्या कॅचमेंट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने तलावाची पातळी पूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचली आहे आणि त्यामुळे तो वाहू लागला आहे. सध्या तलावातील पाण्याची पातळी 195.10 फूट इतकी नोंदवण्यात आली आहे. ही मुंबईकरांच्यादृष्टीने दिलासादायक बाब आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणारे बहुतांश तलाव हे शहराच्या बाहेर आहेत. मात्र, मुंबई लगतच्या भागांमध्येही गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे या सर्व तलावांमधील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. परंतु, आता हे तलाव कधी भरणार, याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे. जून आणि जुलै महिन्यातील पाऊस हा मुंबईकरांच्यादृष्टीने महत्त्वाचा मानला जातो. या दोन महिन्यांमध्ये होणाऱ्या पावसामुळे शक्यतो मुंबईतील तलाव भरतात. हा पाणीसाठा वर्षभर मुंबईकरांना पुरतो. त्यामुळे पाऊस आल्यानंतर मुंबईला पाणीपुरवठा करणारे सात तलाव कधी भरतात, याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या असात. (Mumbai News)
Mumbai weather updates: मुंबईत पुढील काही तासांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता
मुंबईत रविवारी रात्री आणि सोमवारी दिवसभर मुसळधार पाऊस झाला होता. या पावसामुळे मुंबईतील रस्ते आणि रेल्वे वाहतुकीचा बोजवारा उडाला होता. यानंतर मंगळवारी दिवसभर पावसाने काहीशी विश्रांती घेतली होती. दिवसभर आणि रात्री पावसाच्या तुरळक सरी बरसल्या होत्या. मात्र, बुधवारी मुंबईत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मुंबई उपनगरातील मालाड , अंधेरी, मुलुंड आणि ठाणे शहरात पुढील तासाभरात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. ही शक्यता आता कितपत खरी ठरणार, हे बघावे लागेल.
आणखी वाचा