मुंबई : मुंबई आणि उपनगरांमध्ये सोमवारी रात्रीपासून सुरु झालेल्या जोरदार पावसाचा फटका मुंबईकरांना सहन करावा लागत आहे. या मुसळधार पावसामुळे मुंबईच्या रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला.

रात्रीपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक मुंबई आणि उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. या साचलेल्या पाण्याचा फटका रस्ते वाहतुकीवर झाला आहे. पश्चिम द्रुतगती मार्गासह पूर्व द्रुतगती मार्गावर अनेक ठिकाणी वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

Mumbai Local Train Issue | मुंबईत मुसळधार पावसामुळे मुंबईची लाईफलाईन ठप्प, तिनही लाईनच्या प्रवाशांचा खोळंबा | ABP Majha



मुंबईतील वाहतूक कोंडीचे अपडेट

पश्चिम द्रुतगती मार्ग

पश्चिम द्रुतगती मार्गावर अनेक ठिकाणी ट्राफिक जाम झालं आहे. या मार्गावरील वांद्रे आणि खेरवाडीच्या दरम्यान दादरकडे जाणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे.

माहीम आणि दादरच्या दरम्यान देखील काही प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याची माहिती मिळते आहे.

मुंबई-गुजरात हायवेवर देखील वाहतूक सुरळीत आहे.

पूर्व द्रुतगती मार्ग

पूर्व द्रुतगती मार्गावर किंग्स सर्कल माटुंगा इथे वाहतूक कोंडी झाली आहे. या ठिकाणी मुंबई आणि ठाण्याकडे जाणाऱ्या दोन्ही मार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे.

सायन स्टेशन परिसर भागात तर सायन स्टेशन वरुन पूर्व द्रुतगती मार्गाकवर वाहतूक कोंडी झाली आहे. तसेत सायनवरुन बीकेसीकडे जाणारा संपूर्ण रस्त्यावर संपूर्ण वाहतूक कोंडी पाहायला मिळते आहे.

ठाणे घोडबंदर रोडवर, मुंबई-नाशिक हायवेवर वाहतूक सुरळीत पाहायला मिळते आहे.

लिंक रोड

जेव्हीएलारवरील दुर्गा नगर येथे जोगेश्वरीकडे जाणाऱ्या मार्गिकेवर वाहतूक कोंडी झाली आहे.

एलबीएस रोडवर विक्रोळी आणि गांधी नगरच्या दरम्यान वाहतूक कोंडी पाहायला मिळते आहे

संबंधित बातम्या

Malad Wall collapse | मुंबईतील मालाडमध्ये भिंत कोसळून 18 जणांचा मृत्यू

Mumbai Rain : ‘मातोश्री’ जलमय, महापालिकेच्या कारभाराचे तीनतेरा

Pune Wall Collapse | पुण्यात कात्रज भागात भिंत कोसळून 6 मजूरांचा मृत्यू, पाच गंभीर जखमी

Mumbai Rain | मुसळधार पावसामुळे मुंबईची लाईफलाईन विस्कळीत

Kalyan Wall Collapse | कल्याणमध्ये शाळेची भिंत कोसळून तीन जणांचा मृत्यू