मुंबई : आज सकाळपासून मुंबईसह उपनगरांत रिमझिम पाऊस बरसत होता. परंतु गेल्या दोन तासांपासून पावसाने चांगलाच जोर धरला आहे. त्यामुळे मुंबईतल्या सखल भागांमध्ये पाणी साचले आहे.


चर्चगेट, सायन, दादर, वडाळा, माटुंगा, अंधेरी, कुर्ला, कांदिवली, जेव्हीएलआर परिसरात अनेक ठिकाणी गुडघाभर पाणी साचले आहे. त्यामुळे मुंबईसह उपनगरातील वाहतूक अनेक ठिकाणी ठप्प आहे, तर काही ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.

व्हिडीओ पाहा



आज तारीख 26 जुलै आहे, त्यात मुंबईत मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या 26 जुलै 2005 च्या पावसाच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे आणि वाहतूक ठप्प असल्याने मुंबईकरांच्या मनात धडकी भरली आहे.

गुरुवार आणि शुक्रवारी मुबई, मुंबई उपनगरे आणि आपसापसच्या भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली होती.

कुर्ला पश्चिमेकडील भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.


नवी मुंबईतल्या पनवेल भागात पाणी साचले आहे.


लिंकिंग रोड


डोंबिवली


कांदिवली