मुंबई पाऊस Live, हवामान, ट्रॅफिक लाईव्ह अपडेट
11.15 PM : केळवे रोड स्थानकातून गुजरात मेल गुजरातच्या दिशेने रवाना, पावसाचं पाणी साचल्यापासून कित्येक तासांपासून खोळंबलेली ट्रेन सुरु
11.10 PM : डोंबिवलीच्या नांदिवली भागात दोन तरुण नाल्यात वाहून गेले, 24 वर्षीय तरुण नाल्यात पडल्यावर त्याला वाचवणारा मित्रही पाण्यात पडला, दोघांच्या शोधासाठी अग्निशमन दल घटनास्थळी दाखल
10.55 PM : पावसाची स्थिती पाहता मुंबई उपनगरचे पालकमंत्री विनोद तावडे उद्या मुंबईची पाहणी करणार, विरोधकांच्या टीकेनंतर मुंबईच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी नागपूर अधिवेशन सोडून तावडे मुंबईला जाणार
8.55 PM विरार : केळवा रोड स्टेशनमध्ये सकाळपासून गुजरात मेल, दुरांतो एक्स्प्रेसचे सुमारे एक हजार प्रवासी अडकले, मुंबईकडे जाणाऱ्या 200, गुजरातकडे जाणाऱ्या 800 प्रवाशांचा समावेश, गुजरातला जाणाऱ्यांसाठी विरारहून स्पेशल ट्रेन पाठवणार, मुंबईकडे जाण्यासाठी 6 एसटी, 5 खाजगी बसची प्रशासनाकडून सोय
8.30 PM विरारच्या पुढे एक्स्प्रेसमध्ये अडकलेल्या प्रवाशांसाठी पश्चिम रेल्वेकडून जेवणाची सोय, मुंबई सेंट्रल स्टेशनहून लोकलमधून जेवणाची पाकिटं पाठवली
7.50 PM 'माझा'च्या बातमीनंतर हार्बर मार्गावरील रेल्वे ट्रॅक दुरुस्त करण्याला सुरुवात
7.20 PM वसईत राजवली तिवरी, सातीवली आणि मिठागर परिसरात पाण्यामुळे अडकलेल्या दोनशे जणांची सुटका, मदत आणि पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती
7.15 PM पावसामुळे बडोदा एक्स्प्रेस, शताब्दी एक्स्प्रेसमध्ये नालासोपारा ते विरार दरम्यान अडकलेल्या सातशे प्रवाशांची सुटका, एनडीआरएफ आणि स्थानिक प्रशासनाने सुरक्षित स्थळी हलवलं
6.40 PM हार्बर मार्गावर मानखुर्द आणि गोवंडी रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे रुळाला तडा, सीएसएमटी-पनवेल लोकल वाहतूक विस्कळीत
5.35 PM पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते भाईंदर दरम्यान वाहतूक 15 मिनिटे उशिराने, भाईंदर ते विरार मार्गावरील वाहतूक ठप्प
5.35 PM हार्बर रेल्वेवरील अप आणि डाऊन मार्गावरील वाहतूक 15 मिनिटे उशिराने
5.35 PM मध्य रेल्वेवरील अप आणि डाऊन मार्गावरील वाहतूक अर्धा तास उशिराने
4. 20 PM वसई: मुंबई - अहमदाबाद हायवेवर किनारा हॉटेलजवळ पाणी साचल्यामुळे हायवेवरील वाहतूक धीम्या गतीने
4. 15 PM पावसाचा जोर अोसरल्यामुळे परेल भागातील पाणी ओसरायला सुरुवात
3.30 PM पावसामुळे मुंबई विभागातील 11 वी प्रवेशाच्या वेळापत्रकात बदल, आजची मुदत उद्या सायंकाळी 5 वाजेपर्यंत वाढवली
2. 30 PM दादर- हिंदमाता परिसरात पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात
2.00 PM
मुंबईकरांबरोबरच नेत्यांनाही मुंबईतल्या पावसाचा फटका बसतो आहे. मुंबईत अतिवृष्टी नाही फक्त मुसळधार पाऊस आहे, असं काही वेळेपूर्वी नागपुरात विनोद तावडे म्हणाले होते. मात्र इकडे मुंबईत भाजपनंच पावसाचं कारण देऊन प्रवक्ते संबित पात्रा यांची पत्रकार परिषद रद्द केली आहे. दादरमधलं हे छायाचित्र आहे.
भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा महाराष्ट्रातील भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये हे दोघे जण या छायाचित्रात दिसत आहेत. दादरमधल्या साचलेल्या पाण्यातून त्यांना अशाप्रकारे वाट काढावी लागली.
1.30 PM मुंबईसह उपनगरातील पावसाचा जोर ओसरला
12.47 PM- हार्बर रेल्वे विस्कळीत, मानखुर्दजवळ ट्रॅकवर पाणी भरल्याने वाशी-सीएसएमटी लोकल वाहतूक पुढील सूचनांपर्यंत बंद
12.32 PM जोरदार पावसामुळे पुणे-मुंबई रेल्वे वाहतूक विस्कळीत, अनेक रेल्वे रद्द
1)22105, 22106 इंद्रायणी एक्स्प्रेस रद्द
2) 11007, 11008 डेक्कन एक्स्प्रेस रद्द
3) 51317/51318 - पुणे-कर्जत-पुणे पॅसेंजर
12.10 PM सध्या मुंबई - अहमदाबाद हायवेवर वाहतूक धीम्या गतीने सुरु आहे. काशीमीरा -घोडबंदर हायवे, गुजरात हायवे रोड, हे मार्ग पूर्णपणे पावसाच्या पाण्याने भरलेले आहे. पोलिसांतर्फे सर्व नागरिकांना विनंती करण्यात येत आहे की आवश्यक असेल, अतिशय गरजेचे काम असेल तरच कृपया घराबाहेर पडा.
रस्ते-रेल्वे रुळ पाण्याखाली, गरोदर महिला होडीतून रुग्णालयात
11.58 AM वसईमध्ये अंबाडी नाका ते माणिकपूर नाका वसई गावात जाणाऱ्या रोडवर पाणी आल्याने वाहतूक बंद
पालघर ते बोईसर रोड दरम्यान कोळगाव येथे पाणी आल्याने वाहतुकीसाठी रस्ता बंद
11.40 AM शाळा संचालकांशी बोलून आपत्कालीन विभागांचा आढावा घेतला, पालघरमध्ये पाऊस जास्त असल्याने सुट्टी देण्यात आली आहे. मुंबईत सर्वच ठिकाणी पाऊस नाही, मुख्यध्यापकांना 3 सुट्टी देण्याचा अधिकार आहे. मुंबईत पावसाचा जोर लक्षात घेऊन मुख्याध्यापकांनी सुट्टी जाहीर करावी अशा सूचना शिक्षण संचालकांनी दिल्या आहेत.- विनोद तावडे
11.30 AM - ठाण्यातील शाळांना सुट्ट्या जाहीर
11.20 AM मुंबई लोकल रेल्वे अपडेट 11.20
मध्य रेल्वे 30 मिनिटे उशिरा, शीव-माटुंगादरम्यान रेल्वे ट्रॅकवर पाणी भरलं, फास्ट लोकल स्लो ट्रॅकवर वळवल्या. सायन-माटुंग्यादरम्यान लोकल अत्यंत धीम्या गतीने
पश्चिम रेल्वे 15 ते 20 मिनिटे उशिरा – नालासोपाऱ्यात रेल्वे ट्रॅक पाण्याखाली, वसई-विरार लोकल वाहतूक ठप्प, चर्चगेट ते वसई लोकल 20 मिनिटे उशिरा
हार्बर रेल्वे 20 मिनिटे उशिरा – हार्बर रेल्वे मार्गावर कुठेही पाणी तुंबल्याची स्थिती नाही, मात्र लोकल वाहतूक धीम्या गतीने
11.13 AM मुंबईत 11 ठिकाणी पाणी साचलं, शिक्षणमंत्र्यांनी आढावा घेऊन शाळांबाबत निर्णय घ्यावा- मुख्यमंत्री
11.10 AM - पावसाने मुंबईची अवस्था बिकट झाली, मुंबईतील शाळांना सुट्टी द्या - आशिष शेलार
10. 41 AM वसई - मिठागरांत अडकलेले लोक आपल्या घरी आहेत. पाण्याची पातळी वाढली आहे. लोकांच्या घरात पाणी शिरलं आहे. त्यामुळे सध्या वसई विरार महानगर पालिकेचे अग्निशमन विभागाचे कर्मचारी लोकांना बाहेर काढण्याचे काम करत आहेत.
10.41 AM - माटुंगा रेल्वे ट्रॅकही पाण्याखाली
10.32 AM पूर्व द्रुतगती मार्गावर माटुंगा उड्डाणपुलावर प्रचंड वाहतूक कोंडी
10.30 AM सिंधुदुर्ग - दोडामार्ग, सावंतवाडी, कुडाळ, कणकवली वैभववाडीत मुसळधार पाऊस, मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक मंदावली, अनेक ठिकाणी सकल भागात पाणी साचले,हवामान विभागाचा मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज
10.15 AM पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांसाठी हेल्पलाईन नंबर – मुंबई सेंट्रल - 23077292 / 02267645552 ,वांद्रे टर्मिनस - 26425756 / 02267647594, बोरिवली – 02267634146, सुरत - 02612401791
10.00 AM विनोद तावडे यांची प्रतिक्रिया
मुंबईत अतिवृष्टीचा इशारा नाही,मुसळधार पावसाचाही नाही. सकाळी 8.30 वाजता भरतीची वेळ निघून गेली आहे. पाणी साचून विद्यार्थी अडकण्याची शक्यता नाही. त्यामुळे कालप्रमाणे आज तात्काळ सुट्टीची घोषणा करण्याची गरज वाटत नाही. आपत्कालीन व्यवस्थापनाशी मुंबईचा पालक मंत्री म्हणून संपर्कात आहे. विरोधकांनी पॅनिकची स्थिती निर्माण करू नये. आम्हाला सल्ला देण्याची गरज नाही, सर्व यंत्रणा योग्य ती पावले उचलत आहे . गरज लागली तर अख्खं मंत्रिमंडळ नागपूरहून मुंबईला जाईल- विनोद तावडे
9.20 AM - नालासोपाऱ्यात अनेक ठिकाणी पाणी साचलं, गुडघाभर पाण्यातून वाट काढत नागरिकांचं मार्गक्रमण
9.10 AM - गेल्या 24 तासात मुंबईत 165.8 मिमी तर उपनगरात 184.3 मिमी पावसाची नोंद, विरारमध्ये 24 तासात 235 मिमी तर वसईत पाऊस 299 मिमी पावसाची नोंद
9.00 AM गेल्या २४ तासात विरारमध्ये 235 मिमी पाऊस झाला आहे. तर वसईत पाऊस 299 मिमी पावसाची नोंद
8.58 AM वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर मोठी वाहतूक कोंडी, गोरेगाव ते वांद्रेदरम्यान वाहनांच्या लांबच लांब रांगा, जोरदार पावसाने ट्रॅफिक जाम, वाहनचालकांची कसरत
8.50 AM - वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर मोठी वाहतूक कोंडी, जोरदार पावसाने ट्रॅफिक जाम, वाहनचालकांची कसरत
8.40 AM - वांद्रे सी लिंकवर वाऱ्यासह जोरदार पाऊस
8.45 AM नालासोपाऱ्यात रेल्वे ट्रॅक पाण्याखाली, वसई, विरार भागात तुफान पाऊस
8. 30 AM एस व्ही रोड इर्ला इथे पाणी तुंबलं, विले पार्ले, नानावटी रुग्णालय परिसरातही रस्त्यावर पाणीच पाणी
8.20 AM वडाळा, चेंबूर, माटुंगा परिसरात मुसळधार पाऊस, हिंदमाता परिसरात पाणी साचण्यास सुरुवात
7.56 AM वरळी, दादर, परेल, लालबाग परिसरात पावसाचा जोर वाढला
7.55 AM पालघर- जिल्ह्यातील सफाळे,केळवे, पालघर भागात रात्रभर मुसळधार, रेल्वे वाहतुकीवर परिणाम, अनेक ठिकाणी पाणी साचले. बोईसर बेटेगाव रस्ता पाण्याखाली
7.50 AM - चर्चगेट ते बोरिवली 15 ते 20 मिनिटे उशिरा, बोरिवली ते विरार ठप्प, तर मध्य आणि हार्बर रेल्वे 15 ते 20 मिनिटे उशिरा
7. 45 AM रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे जयपूर- वांद्रे एक्स्प्रेस आणि सौराष्ट्र मेल या गाड्या पालघर स्थानकात तर अवंतिका एक्स्प्रेस सफाळे स्थानकात उभी आहे.
7.45 AM लालबाग, घोडपदेव, माझगाव परिसरात जोरदार पाऊस
7.30 AM डबेवाल्यांची सेवा आज बंद राहणार, मुसळधार पावसाचा लोकल वाहतुकीवर परिणाम आणि हवामान खात्याने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर निर्णय
7.18 AM मुसळधार पावसामुळे दहिसर पूर्व एनजी पार्क परिसरात 3 घरं कोसळली, अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल, दुर्घटनेच्या वेळी घरात कुणी नसल्याने जीवितहानी टळली
7.15 AM बोरिवली ते विरार ट्रेन पूर्णपणे बंद, नालासोपाऱ्यासह काही स्टेशनवरील ट्रॅकवर पाणी आल्यानं बोरिवलीपासून विरार अप-डाऊन वाहतूक बंद, बोरिवलीपासून चर्चगेटपर्यंत लोकल 15-20 मिनिट उशीरानं, मध्य आणि हार्बर रेल्वेवरील वाहतूकही 15 ते 20 मिनिटं उशीरानं
लोकल विस्कळीत
मुंबईत होणाऱ्या पावसाचा लोकल सेवेवर परिणाम होत आहे. कारण अनेक स्टेशनमध्ये ट्रॅकवर पाणी आलं आहे. नालासोपारा स्टेशनवरच्या रेल्वे रुळांवर सध्या पाणी आल्याचं चित्र आहे. ट्रॅक पाण्याखाली गेले आहेत.
विरार:- नालासोपारा रेल्वेस्थानाकात ट्रॅकवर पाणी भरले. त्यामुळे लोकलसेवा विस्कळीत झाली आहे. विरारहून सुटणाऱ्या सर्व लोकल 1 तास उशिराने धावत आहेत.
दरम्यान मुसळधार पावासाचा रस्ते वाहतुकीवरही परिणाम होणार आहे. मालाड सबवेमध्ये सकाळीच पाणी भरल्याचं कळतंय.
बोरिवलीत 3 घरं जमीनदोस्त
मुंबईत रात्रभर सुरु असलेल्या पावसामुळं बोरिवलीतल्या अशोकनगर भागात 3 घरं जमीनदोस्त झाली आहेत. यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. मात्र मालमत्तेचं मोठं नुकसान झालं आहे. रात्री 10 वाजताच्या सुमारास ही घरं पडण्यास सुरुवात झाली. त्यानंतर रहिवाशांना बाहेर काढण्यात आलं. सध्या अग्निशमन दलातर्फे इथं ढिगारा हटवण्याचं काम सुरु आहे.
वसईत घरं पुराने वेढली
वसई पूर्व भागात असलेल्या मिठागारातील वस्ती पुरानं वेढलेली असतानाही 400 जणांनी घरं सोडण्यास नकार दिला.
या लोकांच्या सुटकेसाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, या वस्तीच्या चारही बाजूंनी मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. होड्यांचा आधाराने त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न होत आहेत. मात्र तिथले लोक आपली घरं सोडून यायला तयार नाहीत. त्यामुळे बचावकार्यात अनेक अडचणी येत आहेत.