Mumbai Rain Update : पुढील दोन दिवसांत म्हणजे 2 आणि 3 जुलै रोजी मुंबईतील काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. शहर आणि उपनगरात बहुतांशी मध्यम ते मुसळधार पाऊस अपेक्षित आहे. 4 आणि 5 जुलै रोजी हा हलका मध्यम पाऊस असेल कारण पावसाची तीव्रता कमी होईल. ६ जुलै पासून पाऊस पुन्हा जोर धरणार आहे. उत्तर भागात जास्त पाऊस अपेक्षित आहे, दक्षिण मुंबईत मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे, असा अंदाज हवामान अभ्यासक ऋषिकेश आग्रे यांनी व्यक्त केला आहे.
सोमवारी शहापूरमध्ये मुसळधार पावसाची हजेरी
शहापूरमध्ये सकाळपासून संतधार पाऊस सुरू झाला असून मुंबई नाशिक महामार्गावर शहापूर - आसनगाव, वशिंद दरम्यान मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी 7 ते 8 किलोमीटर पर्यंत लागल्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. सतत होत असल्या पावसामुळे मुंबई नाशिक महामार्ग वरती ठिकाणी खड्डे पडले आहेत. तर दुसरीकडे रेल्वेचे ब्रिज व वाशिंद या ठिकाणी उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने मुंबई नाशिक महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना वाहन चालकांना करावा लागत आहे. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि येथील प्रशासन कूचकामी ठरत आहेत. या वाहतूक कोंडीला चाकरमानी, सर्वसामान्य नागरिक आणि पोलीस सुद्धा अक्षरशा वैतागले आहेत.
पुढील तीन ते चार दिवस राज्यातील काही भागात मुसळधार पाऊस पडेल
मुंबईत मागील दोन दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली होती. पावसाचा जोर शनिवार पासून कमी झालेला नाही. हरातील दादर, परळ आणि मुंबई सेंट्रल भागात सकाळी जोरदार पावसाने हजेरी लावली होती. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे मोसमी पाऊस सक्रिय होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यामुळे पुढील तीन ते चार दिवस राज्यातील काही भागात मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज व्यक्त केला जातोय.
इतर महत्वाच्या बातम्या