मुंबईत मुसळधार, रस्ते वाहतूक आणि मध्य रेल्वेचा खोळंबा
अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई | 01 Jul 2016 06:01 AM (IST)
मुंबई : दक्षिण मुंबईत मुसळधार पावसानं हजेरी लावलीय. यामुळे दादर परिसरात वाहतुकीची कोंडी बघायला मिळते. वांद्रे आणि माहिम परिसरातही जोरदार पाऊस झालाय. रस्ते वाहतुकीसोबतच लोकल सेवेवरही परिणाम झाला आहे. कळव्याजवळ लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे सीएसटीकडे जाणारी मध्य रेल्वेची वाहतूक अर्धा तास उशिराने सुरु आहे. जेव्हीएलआर मार्गावर ट्रक बंद पडल्यामुळे कांजूर मार्गावरुन पवईकडे येणारी वाहतूक खोळंबलीय. पश्चिम द्रुतगती मार्गावर दिंडोशीजवळ वाहतुक धीम्या गतीनं सुरु आहे.