मुंबई: 'गौप्यस्फोट करून देश हादरवण्याची भाषा करणाऱ्या एकनाथ खडसेंनी अचानक आपल्या विधानावरून घुमजाव केलं आहे. दाऊदचा एकनाथ खडसेंना फोन आला होता हे सिद्ध झालं असतं तर देश हादरला असता, अशी सारवासारव एकनाथ खडसेंनी केली आहे.'


 

दरम्यान, 'मी तोंड उघडलं तर देश हादरेल असं वक्तव्य एकनाथ खडसेंनी जळगावमध्ये भाजपच्या मेळाव्यात बोलताना केलं होतं.' त्यावरून विरोधकांनी एकनाथ खडसेंना गौप्यस्फोट करण्याचं आव्हान केलं होतं. विरोधकांच्या आव्हानानंतर एकनाथ खडसे बॅकफूटवर गेलेल दिसत आहेत. कदाचित म्हणूनच त्यांनी गौप्यस्फोट करून देश हादरवण्याएवजी सारवासारव सुरू केली आहे.

 

मध्यंतरी एकनाथ खडसेंवर एकामागे एक अनेक आरोप झाल्यामुळं त्यांना राजीनामा द्यावा लागला. 'मात्र मी तोंड उघडलं तर संपूर्ण देश हादरेल', असं वक्तव्य करून खडसेंनी त्यांच्या पक्षातल्या आणि पक्षाबाहेरच्या शत्रूंना सूचक इशारा दिला होता. मात्र आता त्या वक्तव्यावरुन त्यांनी यू-टर्न घेतला आहे.

 

संबंधित बातम्या:

 

युती तुटली नसती, तर सेनेचा मुख्यमंत्री झाला असता: खडसे