मुंबई उपनगरात मुसळधार पाऊस, लोकलची स्थिती काय?
एबीपी माझा वेब टीम | 29 Jun 2016 03:38 AM (IST)
मुंबई : गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाची उघडझाप सुरुच आहे. बुधवारी सकाळपासून मुंबईतील उपनगरांमध्ये पावसाला सुरुवात झाली. मुंबईतल्या कुर्ला, अंधेरी, घाटकोपर, वांद्रे या उपनगरात आज मुसळधार पाऊस झाला. अंधेरी आणि कुर्ला उपनगरात अर्ध्या तासातच 11 मिलिमीटर पावसाची नोंद केली गेली. मात्र यामुळे रस्ते आणि लोकल वाहतुकीवर कोणताही परिणाम झालेला नाहीय.