गोविंदा सहाव्या थरावरुन पडतानाचा थरार कॅमेऱ्यात कैद
एबीपी माझा वेब टीम | 26 Aug 2016 02:14 PM (IST)
उल्हासनगर : उल्हासनगरमध्ये दहीहंडीच्या सहाव्या थरावरुन पडल्याने 13 वर्षीय गोविंदा गंभीर जखमी झाला आहे. गोविंदा कोसळल्याची ही थरारक घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. उल्हासनगरमधील राधेशाम गोविंदा पथकाचा 13 वर्षीय गोविंदा सुजल गडापकर सहाव्या थरारवर चढला होता. त्यावेळी त्याचा तोल गेल्याने तो जमिनीवर कोसळला. या अपघातात त्याच्या डोक्याला आणि छातीला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर कल्याणमधील फोर्टिस रुग्णालयात उपचार सुरु आहेत.