मुंबई : थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी एकीकडे सर्वांची तयारी सुरु असताना मुंबई पोलिसांनीही चोख बंदोबस्त केला आहे. आयसिसचा संभाव्य धोका लक्षात घेत मुंबईत विशेष दक्षता घेण्यात येणार आहे.
गर्दीमध्ये एखादी गाडी उपस्थित नागरिकांच्या अंगावर घालून नरसंहार करण्याचा डाव आयसिसने यापूर्वी काही ठिकाणी साधला आहे. ही शक्यता लक्षात घेत खबरदारीचा उपाय म्हणून मरिन ड्राईव्ह, वरळी सी-फेस सारख्या ठिकाणी बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. या परिसरांना नो पार्किंग झोन घोषित करण्यात आलं आहे.
मुंबई पोलिसांनी काही दिवसांपूर्वी एटीएससोबत मिळून मरिन ड्राईव्ह परिसराची पाहणीही केली. यामध्ये पोलिसांनी रस्ता आणि फुटपाथ यांच्यातील कमी अंतर असलेल्या 17 जागा शोधल्या आहेत.
गाडी सहज फुटपाथवर चढवली जाऊन नागरिकांच्या अंगावर घालत हल्ला करण्याची शक्यता टाळण्यासाठी हा उपाय आखण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी या सर्व परिसरात बंदोबस्त वाढवून सरकारला एक अहवाल सादर केला आहे.
31st ला आयसिसचा संभाव्य धोका, मुंबई पोलिसांचा बंदोबस्त
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
28 Dec 2017 08:25 PM (IST)
खबरदारीचा उपाय म्हणून मरिन ड्राईव्ह, वरळी सी-फेस सारख्या ठिकाणी बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. या परिसरांना नो पार्किंग झोन घोषित करण्यात आलं आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -