Mumbai Police : महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, हरियाणा उत्तर प्रदेश, दिल्ली इत्यादी राज्यातून ट्रक टेम्पो चोरी करायचे. त्यावरील मूळ इंजिन आणि चेसिस नंबर खोडून, बनावट कागदपञे आणि इंजिन चेसिस नंबर टाकून, चोरीचे वाहनं आरटीओ रजिस्टर करायचे. त्यानंतर ती वाहने विकली जात होती. त्या आतंरराज्यीय टोळीला पकडण्यात मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखा 1 ला यश आलं आहे. 4 कोटी 75 लाख किंमतीची 53 वाहने पोलीसांनी हस्तगत केली आहेत.
48 आयशर कंपनीचे ट्रक, 2 टाटा कंपनीचे ट्रक, 1 अशोक लेलॅण्ड कंपनीचा ट्रक, 2 क्रेटा कार अशा एकूण 53 वाहनं मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखा १ च्या युनिटनं हस्तगत करण्यात यश मिळवलं आहे. एक मोठं आतंरराज्यीय टोळीचा रॅकेटचा भांडाफोड पोलिसांनी केलं आहे. आरोपी दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरियाणा, गुजरात, महाराष्ट्र या राज्यातून रस्त्यावर उभं असलेली अवजड वाहन ही टार्गेट करत होते. विशेषतः आयशर कंपनीचे ट्रकही टोळी टार्गेट करत होती. आरोपी हे वाहनं चोरुन त्यावरील मूळ इंजिन व चेसिसनंबर खोडून त्यावर बनावट कागपञे तयार करायची. त्यानंतर या वाहनांवर दुसरे इंजिन आणि चेसिस नंबर टाकून, गुजरात, राजस्थान आणि हरियाणा येथील पोलीस आणि आर.टी.ओ.च्या मदतीने ही टोळी गाडी रजिस्टर करुन विकायचे. त्यांनी आतापर्यंत आशा रितीने 4 कोटी 75 लाख किंमतीचे एकूण 53 वाहने चोरुन, विकली असल्याचे निष्पन्न झाली आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरियाणा, गुजरात, महाराष्ट्र या राज्यातून ही वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत. आज चार आयशर टॅम्पो मालकांना त्यांची वाहने परत ही दिली आहेत. आता या चोरलेल्या गाड्यांच्या तज्ञांना बोलावून त्यांच्याकडून मुळ मालकांचा शोध ही पोलीस घेत आहेत. सध्या या गुन्ह्यात मास्टर माईंड आरोपी फारुख तैय्यब खान आणि त्याचा साथिदार मुबिन हारिस खान या दोघांना राजस्थान मधून अलवारा जिल्हातून अटक केली आहे. आणखीन ही आरोपी यात अटक होणं बाकी असल्याची माहिती पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांनी दिली आहे.
राजस्थानमधील अलवारा जिल्हातील आरोपी फारुख खान आणि मुबिन खान या दोघांना पकडणे गुन्हे शाखा 2 च्या युनिटला मोठं आवाहनात्मक होतं. मेवाती समाजाचा येथे मोठ्या प्रमाणात साम्राज्य आहे. हे गाव मुस्लिम बहुल ही होतं. येथील गावातून आरोपींना पकडण्यास बाहेर राज्यातील पोलीस गेल्यावर तेथील गावकरी पोलिसांवर हल्ला करतात. त्यामुळे गावक-यांच्या रोषाला सामोरं न जाता, आरोपींना अटक करणं मोठं आवहान पोलिसांसमोर होतं. चार ते पाच दिवस पोलिसांनी आरोपीवर पॉलत ठेवली. आरोपी हे क्रिकेट खेळण्यास बाहेर गावी येत असल्याची पोलिसांना खबर मिळाल्यावर पोलिसांनी आरोपी बाहेर गावी क्रिकेट खेळायला आल्यावर त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. या जिल्ह्यातील काही गावात तर आरोपीवर चोरीचे गुन्हे जास्त तसेच ज्या चोरांने मोठी चोरी केली असल्यास त्या चोरांशी मुलीचे आईवडिल प्रथम प्राधान्यानं लग्न लावून देत असल्याची माहिती नाव न छापण्याच्या अटीवर पोलिसांनी दिली आहे.