मुंबई : थर्टी फर्स्टच्या पार्टीसाठी आणलेलं 3 किलो एमडी ड्रग्ज पकडण्यात आलं आहे. मुंबईच्या अंधेरीतील आंबोली पोलिसांनी 3 किलो एमडी ड्रग्ज पकडलं. 31 डिसेंबरच्या पार्टीसाठी आलेल्या ड्रग्जवर कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी पकडलेल्या या ड्रग्जची किंमत साधारण एक कोटींच्या आसपास असल्याचं बोललं जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरु आहे.
मुंबईसह जगभरात थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनची धूम आहे. त्यातच असे प्रकारही समोर येत आहेत. या सेलिब्रेशनदरम्यान काही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मुंबई पोलिसांनी कंबर कसली आहे. सर्वच महत्त्वाच्या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.