मुंबई: मुंबईत पुन्हा एकदा छमछम सुरु होणार आहे. कारण मुंबई पोलिसांकडून 3 डान्सबारना परवाने देण्यात आले आहेत. त्यामुळं मुंबईत पुन्हा एकदा डान्सबार सुरु होणार असल्याचं जवळजवळ निश्चित आहे.

 

राज्य सरकारच्या जाचक अटींविरोधात आणि डान्सबारचे पुन्हा परवाने मिळावे यासाठी डान्स बार मालकांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. त्यानंतर सुप्रीम कोर्टानं राज्य सरकारला 8 डान्सबारना परवाने देण्याचे आदेश दिले होते.

 

त्यानुसार इंडियाना, साईप्रसाद आणि एरो पंजाब या डान्सबारना मुंबई पोलिसांकडून परवाने देण्यात आले आहेत. उर्वरित 5 डान्सबारना परवान्याची रक्कम जमा करताच, डान्स बार सुरु करण्याचा परवाना देण्यात येणार आहे. डान्स बारसंदर्भात राज्य सरकारनं एकूण 27 नियम तयार केले आहेत.