एआयबीकडून मोदींच्या फोटोवर डॉग फिल्टर
एबीपी माझा वेब टीम | 14 Jul 2017 03:22 PM (IST)
एआयबी या कॉमेडी ग्रुपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारख्या दिसणाऱ्या व्यक्तीचा फोटो टि्वटरवर शेअर करून त्यांची खिल्ली उडवली आहे.
NEXT PREV
मुंबई: एआयबी या कॉमेडी ग्रुपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारख्या दिसणाऱ्या व्यक्तीचा फोटो टि्वटरवर शेअर करून त्यांची खिल्ली उडवली आहे. त्यानंतर एआयबीने मोदींच्या खऱ्याखुऱ्या फोटोवर स्नॅपचॅटवरच 'डॉगी फिल्टर' लावून मोदींच्या फोटोची खिल्ली उडवली आहे. नेटकऱ्यांनी या फोटोवरून तीव्र शब्दात निषेध नोंदविल्यानंतर एआयबीने हा फोटो टि्वटरवरून हटवला आहे. मात्र मुंबई पोलिसांच्या सायबर गुन्हे विभागाने याप्रकणाची गंभीर दखल घेऊन तपास सुरू केला आहे. तसंच पोलिसांनी गुन्हाही दाखल केला आहे. यापूर्वीही एआयबी हा ग्रुप प्रचंड वादात होता. विनोदादरम्यान अश्लिल शब्द आणि शिव्यांमुळे या ग्रुपवर टीका झाली होती.