मुंबईतल्या ईस्टर्न फ्री वेवर 5 फुटांचा अजगर
एबीपी माझा वेब टीम | 14 Jul 2017 12:07 AM (IST)
मुंबईतल्या ईस्टर्न फ्री वेवरच्या उड्डाणपुलावर काल (गुरवार) 5 फुटांचा अजगर आढळून आला. पुलावरुन जाणाऱ्या वाहनचालकांनी या अजगराला पाहिलं आणि एकच घबराट उडाली.
मुंबई: मुंबईतल्या ईस्टर्न फ्री वेवरच्या उड्डाणपुलावर काल (गुरुवार) 5 फुटांचा अजगर आढळून आला. पुलावरुन जाणाऱ्या वाहनचालकांनी या अजगराला पाहिलं आणि एकच घबराट उडाली. पण या अजगराला कोणतीही इजा पोहचवता लोकांनी तातडीनं वाहतूक पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर एका सर्पमित्राच्या मदतीनं या अजगराला ठाण्याच्या जंगलात सोडून देण्यात आलं. सर्पमित्राच्या मते, हा 5 फुटी इंडियन रॉक पॅथॉन म्हणजे भारतात आढळणारा अजगर आहे.