मुंबई : एअर इंडियाची खासगीकरणाची प्रक्रिया सुरू झालेय. मात्र या खासगीकरणाचा मोठा फटका एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना बसणार आहे. मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळ असलेल्या एअर इंडिया वसाहतीमधील रहिवाशांना नागरी उड्डाण मंत्रालयातर्फे घर रिकामं करण्यासंदर्भात पत्रं मिळालंय. या वसाहतीत जवळपास 1600 कुटुंब राहतात. मात्र खासगीकरण झाल्यानंतर अवघ्या 6 महिन्यात त्यांना घर सोडावं लागणार आहे.


मंत्रालयाच्या पत्रात दुसरीकडे रहाण्याची सोय किंवा अपेक्षित घर भाडे या बाबत कोणताही उल्लेख नाही, त्यामुळे अनेक नागरिकांनी सरकारच्या या निर्णयाचा पुनर्विचार व्हावा अशी मागणी केली आहे.एअरपोर्टला  लागून  वसाहत असल्याने कर्मचारी कोणत्याही क्षणी कामावर  पोहचत आहेत. मात्र या कॉलनीमधून इतरत्र गेल्यास त्यांना आणि एअर इंडिया प्रशासनाला देखील मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. यामुळे सरकार आणि संबंधित मंत्रालयाने या बाबत पुनर्विचार करण्याची मागणी येथील कर्मचारी आणि त्यांचे परिवार करीत आहेत. 


कलीना येथे एयर इंडिया च्या एकूण चार कॉलनी आहेत. यातील महिला कॉलनी 1956 , दुसरी 1965, तिसरी 1971, चौथी 1980 निर्माण झाली आहे. या चार ही कॉलनी मिळून 1600 कुटुंब म्हणजे अंदाजे 10 हजार  लोक येथे रहातात. या कॉलनी चा एकूण क्षेत्रफळ 184 एकर इतके मोठे आहे.  कॉलनीमध्ये एकूण दोन मैदाने आहेत. एक फुटबॉलचे आणि  एक क्रिकेट चे मैदान आहे. सध्या या मैदानात भारतीय महिला क्रिकेट संघ सराव करतो.तसेच या मैदानातून देशाला  शिवम दुबे, पृथ्वी शो, यशस्वी जैसवाल सारखे खेळाडू मिळाले आहेत.


संबंधित बातम्या :


Air India Sale: एयर इंडियाच्या खरेदीसाठी आता कोलकात्याच्या पवन रुईयांचीही दावेदारी


Mumbai Airport HQ :" मुंबई विमानतळाचे मुख्यालय कुठेही जाणार नाही", अदानी ग्रुपचं स्पष्टीकरण