Mumbai Crime : मुंबई (Mumbai)आणि इतर भागातील 21 हून अधिक महिलांचे अश्‍लील व्हिडीओ बनवून त्यांना ब्लॅकमेल केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी गुजरातमधील एका 19 वर्षीय तरुणाला अटक केली आहे. प्रशांत आदित्य असं या तरुणाचं नाव आहे. तो गुजरातच्या गांधीनगरमध्ये बसून देशातील अनेक भागातील महिलांना ब्लॅकमेल करुन त्यांच्याकडून पैसे उकळत होता. महिलांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरील छायाचित्रांचा वापर अश्लील क्लिप बनवण्यासाठी करत होता. नंतर ती क्लिप डिलीट करण्यासाठी पैसे उकळत असे. 


खरंतर सोशल मीडियावर आपल्या खासगी आयुष्यातील फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करणं सामान्य बाब आहे. परंतु कधी कधी सोशल मीडियावर अनोळखी लोकांशी मैत्री करणं किंवा त्यांनी बनवलेल्या ग्रुपशी संलग्न होणं महागात पडू शकतं. मुंबईतील अँटॉप हिल पोलिसांनी अशाच एका तरुणाला अटक केली आहे. इन्स्टाग्रामवरुन महिलांचे फोटो आणि व्हिडीओ चोरुन त्यावर अश्लील किंवा पॉर्न फिल्मचा ऑडिओ क्लिप एडिट करुन व्हिडीओ बनवत होता. नंतर त्याच महिलांना तो ब्लॅकमेल करत होता. 500 आणि 1000 रुपयांसाठी तो महिलांना ब्लॅकमेल करत होता. पण ब्लॅकमेल करण्याची पद्धत अतिश वाईट आणि वेगळी होती.


प्रशांत आदित्य ब्लॅकमेलिंग कसं करायचा?
प्रशांत आदित्य इन्स्टाग्रामवर कम्युनिटीमध्ये अॅड होता.
इन्स्टाग्रामवर या कम्युनिटीमध्ये ज्या महिलांचे फोटो असायचे त्याच्या बॅकग्राऊंडला प्रशांत पॉर्न फिल्मचा साऊंडवर लावायचा
मग त्या महिलांना हा व्हिडीओ किंवा फोटो पाठवून ते व्हायरल करण्याची धमकी देत असे
व्हिडीओ व्हायरल करु नये यासाठी तो महिलांकडून 500 ते 1000, 5000 रुपयांची मागणी करायचा
अशाप्रकारे तो अनेक महिलांना ब्लॅकमेल करायला
प्रशांत आदित्य हा दहावी नापास आहे


पोलिसांचं आवाहन
अशा लोकांच्या जाळ्यात अडकू नका, असं आवाहनही पोलिसांनी केलं आहे. तसंच कोणाच्या डोळ्यादेखत हा प्रकार घडल्यास किंवा त्यांच्यासोबत असं घडल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा, असं आवाहनही पोलिसांनी केलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या तरुणाने 21 महिलांना ब्लॅकमेल केल्याचा आरोप आहे. परंतु चौकशीत त्याने हा आकडा 50 पेक्षा जास्त असल्याचा दावा केला आहे. प्रशांत आदित्यचं हे जाळे केवळ एका राज्यात नाही तर संपूर्ण देशात पसरले होतं.