मुंबई : एकीकडे कोरोनाला रोखण्यासाठी मुंबईसह राज्यात लॉकडाऊन लावण्यात आला आहे. मात्र दुसरीकडे मुंबईत अजूनही अनेकजण विनाकारण घराबाहेर पडताना दिसत आहे. मुंबई उपनगरातील पवई तलावावर शनिवारी अशाच प्रकारे प्रेमीयुगुलांची मोठी गर्दी झाली होती. या वेळी येथे गस्तीवर आलेल्या पोलिसांनी त्यांना चांगलेच सुनावले. काल शनिवारी सुट्टीचा दिवस असल्याने पवई तलावावर मोठ्या प्रमाणत प्रेमी युगुलांची गर्दी झाली होती. याची माहिती पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण हरगुडे यांना मिळाली त्यांनी तात्काळ त्या ठिकाणी जाऊन गस्तीवर असलेल्या पोलिसांसह या तरुणाईला कोव्हिड बाबत काळजी घेण्याचा सल्ला दिला. तसेच गर्दी केल्यामुळे कडक शब्दात कानउघडणीही केली. थोड्या वेळाने त्या सर्वांना समजावून घरी पाठविण्यात आले.


मुंबईत कालच्या तुलनेत आज पुन्हा कोरोना रुग्णसंख्येत वाढ


मुंबईत कालच्या तुलनेत आज पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येत काहीशी वाढ पाहायला मिळाली. मुंबईत गेल्या 24 तासात 1431 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1470 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे, तर आतापर्यंतची ही संख्या 6 लाख 52 हजार 686 वर पोहोचली आहे. सध्या मुंबईत 28410 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. 


मुंबईत 24 ते 26 मे रोजी थेट येणाऱ्यांसाठी लस मिळणार, लसीकरणासाठी महापालिकेच्या गाईडलाईन्स जारी


गेल्या 24 तासात मुंबईत 49 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंत मुंबईत कोरोनामुळे 14 हजार 623 रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. मुंबईत गेल्या 24 तासात 23 हजार 314 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यापैकी 1431 जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. मुंबईचा रिकव्हरी रेट 93 टक्क्यांवर आला आहे. तर रुग्णसंख्या दुपटीचा रेट 331 दिवसांवर गेला आहे.


Maharashtra Corona Cases : राज्यात आज 29,177 रुग्णांना डिस्चार्ज, 26,672 नवीन कोरोना रुग्णांची नोंद


कोरोना विरुद्धच्या लढाईत लसीकरण महत्त्वाची भूमिका निभावत आहे. मात्र लसींच्या तुटवड्यामुळे लसीकरण मोहिमेत व्यत्यय येताना दिसत आहे. आज मुंबईतील लसीकरण पूर्णपणे बंद होतं. रविवारी शहरात लसीकरण बंद असणार आहे. सोमवारच्या लसीकरणासंदर्भातील माहिती ट्विटरच्या माध्यमातून आणि सदर प्रभागांमधूनही देण्यात येईल', असं मुंबई महापालिकेकडून काल ट्वीट करत सांगण्यात आलं होतं.