Mumbai Parking Issue: मुंबईत दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे वाहनांच्या पार्किंगसाठी काही निश्चित धोरण आहे का?, आणि असेल तर कोणते?, अरूंद रस्त्यांवर राहणाऱ्यांच्या वाहनांसाठी काय उपाययोजना केल्या आहेत? असे सवाल उपस्थित करून त्याबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश सोमवारी हायकोर्टानं राज्य सरकारला दिलेत. दिवसेंदिवस वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे मुंबईत वाहनं कुठे उभी करायची? असा सवालही उपस्थित करत वाहनतळांसाठी आणि विशेषत: अरूंद रस्त्यांवरील वाहनांसाठी जागा निश्चित करण्याची आवश्यकता असल्याचं मत हायकोर्टानं व्यक्त केलंय.
टिळक नगर येथील उद्यान गणेश रोड इथं केवळ 20 फुटांचा रस्ता असून या रस्त्यावर बेशिस्तपणे गाड्या पार्किंग केल्या जातात. डिसेंबर 2018 मध्ये येथील एका इमारतीला आग लागली होती. मात्र अग्निशमन दलाचं वाहनही घटनास्थळी पोहोचू न शकल्यानं आगीत होरपळून 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. अशी घटना पुन्हा घडू नये म्हणून राज्य सरकारनं पार्कींगचं धोरण निश्चित करावं व त्याची अंमलबजावणी करावी अशी मागणी करत टिळक नगर नागरीक उत्कर्ष मडळानं मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.
याचा समयाबद्दल टिळक नगर येथील एका नागरिकाने म्हटलं आई की, येथील रहिवाशांना दिलासा मिळू शकतो. लहान ज्या 20 फुटाचे रोड आहेत, त्या 20 फूट रोडमध्ये नो पार्किंग करावं, असं येथील नागरिकांचं म्हणणं आहे. येथील आणखी एका नागरिकाने एबीपी माझाशी बोलताना सांगितलं आहे की, पार्किंगसाठी धोरण ठरवायला हवं आणि तसा निर्णय देखील घ्यायला हवा. जोपर्यंत धोरण ठरत नाही, याबद्दल नियम बनत नाही तोपर्यंत लोकही त्याला प्रतिसाद देणार नाही. फक्त दोन लाईनसाठी नो पार्किंग करून याचा उपयोग होणार नाही. येथील थानिक नागरिकांनी सांगितलं की, टिळक नगर वसाहत जेव्हा झाली, त्यावेळी येथे कमी उत्पन्न असणाऱ्या नागरिकांची संख्या अधिक होती. त्यावेळी एक असा विचार होता की येथे कमी लोक गाड्या खरेदी करतील. मात्र आता असं झालं आहे की, 90 ते 95 टक्के लोकांकडे गाड्या आहेत. मात्र या गाड्या पार्क कुठे करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. येथील लोकांचं म्हणणं आहे की, इमारत निर्मितीच्या कामावेळीच पार्किंगसाठी काय तरतूद आहे, याची माहिती घेणे आवश्यक आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
Car loan Information:
Calculate Car Loan EMI