पालघर : पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी परिसरात 2018 पासून वारंवार भूकंपाचे शेकडो धक्के बसले आहेत. मध्यंतरी काही काळ भूकंपाचे धक्के जाणवले नव्हते त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. मात्र गेल्या महिना भरापासून पुन्हा भूकंपाच्या धक्क्यांनी आपलं डोकं वर काढलं आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये पुन्हा भीतीचे वातावरण आहे.



काल रात्री 10 वाजून 33 मिनिटांनी 2.8, 11 वाजून 41 मिनिटांनी 4.0 तर 12 वाजून 05 मिनिटांनी 3.6 असे रिश्टर स्केलचे धक्के बसले. डहाणू, तलासरी परिसराला भूकंपाचे जवळपास सात ते आठ हादरे बसले. हे धक्के तलासरी,आणि डहाणू तालुक्यातील तलासरी, दापचरी, आंबोली, धानीवरी, ओसारविरा, कासा, बोर्डी, धुंदलवाडी, शिशने परिसरात जाणवले.


तलासरी पोलीस सध्या गावागावात गस्त घालत नागरिकांना धीर देण्याचा प्रयत्न करून पाहणी करत आहेत. कोरोना लॉकडाऊन काळात नागरिकांना भूकंपाने काहीसा दिलासा दिला होता. मात्र आज पुन्हा भूकंपाचा हादरा बसल्याने नागरिक पुन्हा भीतीच्या छायेखाली आले आहेत.


पालघर भूकंप : आरोग्य विभागासह एनडीआरएफला पाचारण

सध्या पालघर प्रशासन कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यात गुंतले असून पुन्हा भूकंप सत्र सुरू झालं असल्याने या भागाकडे कसे लक्ष देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे


भूकंपाचा आतापर्यंतचा घटनाक्रम
नोव्हेंबर आणि डिसेंबर 2018
11 नोव्हेंबर - 3.2 रिश्टर स्केल
24 नोव्हेंबर - 3.3 रिश्टर स्केल,
1 डिसेंबर - 3.1 व 2.9 रिश्टर स्केल
4 डिसेंबर - 3.2 रिश्टर स्केल
7 डिसेंबर - 2.9 रिश्टर स्केल
10 डिसेंबर 2.8 आणि 2.7 रिश्टर स्केल
2019
20 जानेवारी - 3.6 रिश्टर स्केल
24 जानेवारी - 3.4 रिश्टर स्केल
1 फेब्रुवारी - 3.3,3.5,3.0,4.1,3.6,3.5 रिश्टर स्केल
7 फेब्रुवारी - 3.3 रिश्टर स्केल
13 फेब्रुवारी - 3.1 रिश्टर स्केल
20 फेब्रुवारी - 2.9, 2.9, 3.1 रिश्टर स्केल
1 मार्च - 3.2, 4.3 रिश्टर स्केल
9 मार्च - 2.8 रिश्टर स्केल
10 मार्च - 3.5 रिश्टर स्केल
31 मार्च - 3.2 रिश्टर स्केल
2 एप्रिल - 3.0 रिश्टर , 2.9 रिश्टर स्केल
9 एप्रिल - 3.0 रिश्टर स्केल
15 एप्रिल - 3.4 रिश्टर स्केल
12 मे - 2.6 रिश्टर स्केल
10 जुलै - 2.6 रिश्टर स्केल
20 जुलै - 3.5 रिश्टर स्केल
24 जुलै - 3.6, 3.8, 2.8 रिश्टर स्केल
25 जुलै - 4.8, 3.6 रिश्टर स्केल
31 जुलै - 3.00 रिश्टर स्केल
13 ऑगस्ट - 3.2 रिश्टर स्केल
21 ऑगस्ट - 2.5 रिश्टर स्केल
20 सप्टेंबर - 3.3 रिश्टर स्केल
21 सप्टेंबर - 3.2 रिश्टर स्केल
2 सप्टेंबर - 3.4 रिश्टर स्केल
24 सप्टेंबर - 2.8 रिश्टर स्केल
26 ऑक्टोंबर - 2.7 रिश्टर स्केल
18 नोव्हेंबर - 3.9, 3.3, 2.9, 2.3, 24 रिश्टर स्केल
21 नोव्हेंबर - 3.5 रिश्टर स्केल
13 डिसेंबर- दुपारी 4 वाजून 8 मिनिटांपासून सलग 2.8, 3.1, 2.9 असे सलग 3 धक्के बसले, रात्री 9.21 वाजता 3.7 रिश्टर स्केल
14 डिसेंबर पहाटे - 5.22 वाजता 3.8 रिश्टर स्केल


31 जानेवारी 2020 - 3.3 रिश्टर स्केल
19.मार्च 2020 - 3.3 रिश्टर स्केल
1 एप्रिल 2020 - 3.0 रिश्टर स्केल
6 एप्रिल2020 - रात्री 12.18 वाजता 3 .1 रिश्टर स्केल
17 जून 2020 -  सकाळी 11.51 वाजता 2.5 रिश्टर स्केल


4 सप्टेंबर 2020 - 10 वाजून 33 मिनिटं 2.8 रिश्टर स्केल, 11 वाजून 41 मिनिटं 4.0 रिश्टर स्केल, 12 वाजून 05 मिनिटं 3.6 रिश्टर स्केल


संबंधित बातम्या


पालघरमध्ये भूकंपाचे धक्के, चिमुकलीचा मृत्यू