मुंबईतील पी वन पॉवरबोट शर्यतीचं भवितव्य अद्यापही अधांतरीच
एबीपी माझा वेब टीम | 02 Mar 2017 11:43 PM (IST)
मुंबई : मुंबईत होणाऱ्या पी वन पॉवरबोट शर्यतीचं भवितव्य अजूनही अधांतरीच आहे. हेरिटेज कमिटीनं या शर्यतीला अद्यापही परवानगी दिलेली नाही. 3 ते 5 मार्च दरम्यान या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. मुंबई मॅरेथॉनचं आयोजन करणाऱ्या प्रोकॅम इंटरनॅशनल या कंपनीनंच पॉवरबोट शर्यतीचं आयोजन केलं असून या शर्यतीला आंतरराष्ट्रीय मोटोनॉटिक संघटना तसंच महाराष्ट्राच्या पर्यटन विभागाचीही साथ लाभली आहे. यंदा मुंबई मॅरेथॉनदरम्यान वाढीव शुल्क आकारणीवरुन प्रोकॅम आणि मुंबई महापालिकेमध्ये वाद निर्माण झाला होता. त्यामुळे गेट वे ऑफ इंडियाजवळ पॉवरबोटचा अनावरण सोहळा पालिकेनं बंद पाडला होता. त्यानंतर गिरगाव चौपाटीवर या शर्यतीसाठी जेट्टी उभारण्याची परवानगी मिळत नसल्यानं आयोजकांनी हायकोर्टात धाव घेतली होती.