मुंबई : मध्य रेल्वेवर  सुरु असलेला 36 तासांचा मेगाब्लॉक मध्यरात्री दोन वाजता संपणार आहे. शनिवारी दुपारी दोन वाजल्यापासून हा  मेगाब्लॉक (Mega Block) सुरु झाला आहे. या काळात ठाणे स्टेशन जवळ जुन्या धीम्या मार्गिका नवीन बांधलेल्या मार्गीकांना जोडण्याचे महत्त्वपूर्ण काम करण्यात आले. या ब्लॉकदम्यान नवीन मार्गीकेवरून डिझेल इंजिन चालवून परीक्षण देखील करण्यात आलंय. पाचव्या-सहाव्या मार्गिकचं काम वेगात पूर्ण व्हावं यासाठी  फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात 72 तासांचा जम्बो मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. 

Continues below advertisement


मध्य रेल्वेवर सुरू असलेल्या 36 तासांच्या जम्बो मेगाब्लॉक साठी ठाणे आणि कल्याण दरम्यान धीम्या मार्गीका बंद करण्यात आले आहेत. याआधी देखील जेव्हा मार्गिका बंद केल्या होत्या तेव्हा ठाकुर्ली, कोपर, मुंब्रा आणि कळवा स्थानकातील प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागला होता. मात्र सध्या त्रास सहन केल्यानंतर येणाऱ्या काळात प्रवाशांना खूप मोठा फायदा होईल असे मुंबई रेल्वे विकास कॉपोरेशन चे संचालक रवी अग्रवाल यांनी सांगितले आहे.


पाचवी आणि सहावी मार्गिका सुरू झाल्यानंतर मध्य रेल्वे वेळापत्रकामध्ये 100 पेक्षा जास्त लोकल वाढवू शकतात. तसेच मध्य रेल्वेच्या प्रवासी क्षमतेमध्ये अडीच ते तीन लाख प्रवासी वाढतील. त्यामुळेच हे काम महत्त्वपूर्ण असून येणाऱ्या काळात 72 तासांचा सर्वात मोठा आणि शेवटचा जम्बो मेगाब्लॉक घेऊन फेब्रुवारीमध्ये हे काम पूर्ण होणार आहे. 


संबंधित बातम्या


UPI Server Down: यूपीआय सर्व्हर डाऊन; ऑनलाईन डिजिटल पेमेंट व्यवहार ठप्प झाल्यानं ग्राहक वैतागले


Covid Update: केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया उद्या राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांसोबत साधणार संवाद, कोरोना परिस्थितीचा घेणार आढावा


NEET PG Counselling: ठरलं! 'या' तारखेपासून सुरु होणार नीट पीजी काऊंसलिंग; केंद्रीय मंत्री मांडवियांची घोषणा