मुंबई:  रायगडच्या किनाऱ्याजवळ संशयास्पद बोट आढळली आहे. बोटीवर पाकिस्तानी नागरिक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.  नौदल आणि तटरक्षक दलाकडून बोटीची तपासणी सुरू आहे. 

मुंबई अरेबियन कोस्ट किनाऱ्याजवळ आज एक संशयास्पद बोट दिसली. ही बोट रायगडच्या किनारपट्टीवर आढळल्याची माहिती समोर येत आहे.  नौदल आणि तटरक्षक दलाचे अधिकारी या बोटीचा शोध घेत आहेत. आज सकाळी साडेआठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास बोट दिसल्याची माहिती सूत्रांनी  दिली आहे. मुंबई पोलिस बंदर क्षेत्राला सकाळी 10 वाजता याची माहिती देण्यात आली.  ही बोट नौदलाच्या हद्दीत सापडली आहे. त्यामुळे नौदल कारवाई करण्यात येणार आहे.  जॉइंट ऑपरेशन सेंटरने मुंबई पोलिस आणि इतर यंत्रणांना माहिती दिली होती. सूत्रांनी सांगितले की बोट अडवण्यात आली असून त्यात पाकिस्तानी आढळले आहेत. रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घाडगे यांनी  ही दिली आहे. 

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात