मुंबई :  सिद्धविनायकाच्या (Siddhivinayak Temple) नावे भाविकांची फसवणूक करणाऱ्या सुपर्नो प्रदीप सरकार याला दादर पोलिसांनी पश्चिम बंगालमधून अटक केलीय. हा आरोपी मोबाईल अॅपद्वारे सिद्धिविनायक मंदिरात ऑनलाईन दर्शन आणि पूजा करण्याच्या बहाण्याने भाविकांची फसवणूक करायचा. त्यासाठी भाविकांकडून 701 ते 21 हजार रुपये घ्यायचा. तपासात ज्या बँक खात्यात पैसे वळवले गेले ते सरकारचे असल्याचे पोलिसांना आढळले. 


पोलिसांनी  दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने  ऑनलाईन दर्शन देण्याच्या बहाण्याने भाविकांकडून 701 ते 21,000 रुपयांपर्यंत पैसे घ्यायचा. तपासात ज्या बँक खात्यात पैसे वळवले गेले ते सरकारचे असल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. दादर पोलीस आता सुब्रजित बसू, प्राजक्ता सामाता आणि अनिता डे या सुपर्नोच्या साथीदारांचा शोध घेत आहेत. सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टच्या अधिकाऱ्यांनी दादर पोलिसांत तक्रार केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले.


'उत्सव' ॲपवरून भाविकांची फसवणूक


पेडर रोड येथील एका गृहिणीने ट्रस्टशी संपर्क साधला आणि दावा केला की तिची 21,001 रुपयांची फसवणूक झाली आहे. तिने सांगितले की तिच्या वडिलांना ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते आणि तिला त्यांच्यासाठी प्रार्थना करायची होती म्हणून तिने उत्सव अॅपद्वारे ऑनलाईन पूजा बुक केली. त्याच आठवड्यात  काही भाविक प्रसाद मागणीसाठी मंदिरात आले. त्यांच्याकडे पैशाबाबत विचारणा केली असता त्यांनी 'उत्सव' ॲपवरून ऑनलाइन दर्शन आणि पूजा केली असून प्रसाद मंदिरात मिळेल असे सांगितले. यासाठी पैसेही ऑनलाइन पाठविल्याचे हे भाविक म्हणाले. ही भाविकांची फसवणूक असल्याने या प्रकाराची गंभीर दखल न्यासाने घेतली.  ट्रस्टकडे आणखी काही तक्रारी आल्या आहेत.सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टच्या अधिकाऱ्यांनी दादर पोलिसांत तक्रार केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.


सिद्धिविनायक ट्रस्टच्या माध्यमातून बांदेकर मानले पोलिसांचे आभार 


सिद्धिविनायक ट्रस्टच्या माध्यमातून बांदेकर यांनी या कारवाई संदर्भात पोलिसांचे आभार मानले. तसेत  त्यांनी नागरिकांना व भाविकांना आवाहन केले की कोणत्याही ॲपच्या माध्यमातून बुकिंग करू नये. बुकिंग करताना सिद्धीविनायक मंदिर संस्थानाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. 


हे ही वाचा :                                                              


करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन गाभाऱ्यात जाऊन घेता येणार, कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांची माहिती