Talathi Bharti Exams : मुंबईत तलाठी भरती परीक्षा केंद्रावर मोठा गोंधळ (Talathi Recruitment 2023) उडाल्याचं समोर आलं होतं. पवई आयटी पार्क सेंटरवर विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला आहे. उमेदवारांशी संवाद साधण्यासाठी परीक्षा केंद्रावर कोणीही नसल्यानं उमेदवार संतापले आणि त्यांनी थेट परीक्षा केंद्रावरच गोंधळ घातला. दरम्यान, तलाठी भरती परीक्षांवरचं ग्रहण काही सुटायचं नाव घेत नाही. 


सध्या राज्यभरात तलाठी भरती परीक्षा सुरू आहेत. अशातच राज्यभरातील अनेक परीक्षा सेंटर्सवर गोंधळ पाहायला मिळत आहे. 


तलाठी भरती परीक्षा पेपर फुटीसंदर्भात स्पर्धा परीक्षा समन्वय समिती न्यायालयात जाण्याच्या तयारीत 


तलाठी भरती परीक्षेत उघडकीस येत असलेला गैरप्रकार पाहता या सगळ्या संदर्भात तातडीनं चौकशी समिती नेमावी, या मागणीसाठी स्पर्धा परीक्षा समन्वय समिती मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याच्या तयारीत आहे. राज्यभरात तलाठी भरती परीक्षा पार पडत असताना या परीक्षेत हायटेक कॉपी प्रकरण आणि इतर गैरप्रकार समोर येत आहेत. यामध्ये आरोपी गणेश गुसिंगेसह मोठी टोळी कार्यरत असल्याचा संशय असून या गैरप्रकारामुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या उमेदवारांवर अन्याय होत असल्यानं तातडीनं या सगळ्या प्रकारावर चौकशी समिती नेमावी, यासाठी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीमधील परीक्षा देणारे उमेदवार मुंबई उच्च न्यायालयात या आठवड्यात याचिका दाखल करणार आहेत. 


दहा ते पंधरा दिवसांच्या ठराविक वेळेत चौकशी समितीनं आपला अहवाल समोर ठेवावा, तोपर्यंत तलाठी भरती प्रक्रिया स्थगित करून आलेल्या चौकशी समितीच्या अहवालानंतर पुढील पावलं उचलावी, अशी मागणी स्पर्धा परीक्षा समन्वय समिती न्यायालयासमोर ठेवणार आहे. यामध्ये मेहनत, कष्ट करून अभ्यास करणाऱ्या उमेदवारांचा नुकसान होऊ नये यामुळे तातडीने ठराविक वेळेत या सर्व प्रक्रिया राबवण्याचे निर्देश न्यायालयाने द्यावेत, अशी विनंती याचिका कर्त्यांकडून केली जाणार आहे


आम्ही येत्या तीन ते चार दिवसात या सगळ्या संदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहोत, यामध्ये आम्ही राज्य सरकारला स्पर्धा परीक्षा घेण्यासंदर्भाच्या उपाययोजना सुचवल्या होत्या त्याची अंमलबजावणी पुढील परीक्षांमध्ये केली जावी, हे आम्ही न्यायालयासमोर मांडणार आहोत. तलाठी भरती परीक्षेत एकाच शिफ्ट मधील परीक्षेचा पेपर फुटला असं तरी आतापर्यंत समोर आला असलं तरी आमच्या माहितीनुसार इतर काही शब्द पेपर फुटल्याचा संशय आहे. त्यामुळे या सगळ्या संदर्भात चौकशी समितीचे गठन न्यायालयाने करावं अशी विनंती आम्ही याचिके मध्ये करणार आहोत, असं तलाठी भरती परीक्षेचा उमेदवार आणि स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचा सदस्य निलेश गायकवाड यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं आहे. 



Education Loan Information:

Calculate Education Loan EMI