Mumbai News : मुंबई शहरात प्रथमच दोन झेब्रा क्रॉसिंगचा (Zebra Crossing) रंग बदलून लाल आणि पांढरा करण्यात आला आहे.  MMRDA ने या आठवड्यात त्यांच्या कार्यालयाजवळील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) मधील रस्त्यांवर या रंगांची ओळख करून दिली आहे.  चांगल्या दृश्यमानतेसाठी लखनौ आणि नाशिकसह इतर काही शहरांमध्ये क्रॉसिंगचे हे रंग मोठ्या प्रमाणावर वापरले गेले आहेत. इंडियन रोड काँग्रेस (IRC) कलर कोड मार्गदर्शक तत्त्वांनुसार हे रंग वापरण्यात आले आहेत.  


रस्ता डांबरी आणि सिमेंटचा बनवताना रंगाच्या खुणा यात फरक असतो. डांबरी रस्त्यांवर पांढरे आणि काळे रंग दिसत असले तरी सिमेंटच्या रस्त्यांवर तेच रंग नीट दिसत नाहीत. IRC नुसार, ज्या भागांत जास्त गर्दी असते, कोणत्याही ठिकाणी वाहनांच्या पार्किंगमुळे रहदारी होऊ शकते किंवा कॉर्पोरेट भागात वाहनांची जास्त हालचाल होत असेल, तर अशावेळी कलर कोड 35 - लाल रंगाचा वापर करण्यास परवानगी आहे. 


बीकेसी हे कॉर्पोरेट क्षेत्र आहे. सरकारी कार्यालयांव्यतिरिक्त, तिथे अनेक बँका आणि खाजगी कंपन्यांची मुख्य कार्यालयं आहेत. त्यामुळे शहरातही काही वर्दळीचे रस्ते आहेत. आयआरसीचे उपसंचालक (तांत्रिक) राहुल पाटील म्हणाले की, "गेल्या काही वर्षांत लाल रंगाचा वापर झेब्रा क्रॉसिंगवर होत आहे. पाटील यांनी सांगितले की, "आयआरसी कोड 35 नुसार, त्या भागातील रहदारीनुसार झेब्रा क्रॉसिंगला लाल रंग दिला जाऊ शकतो."


एमएमआरडीएच्या म्हणण्यानुसार, बीकेसी रस्त्यावरील लाल आणि पांढर्‍या रंगाचे आयुष्य दोन वर्षांपर्यंत असते. परंतु भारतीय रस्त्यांची परिस्थिती पाहता ते एक वर्ष असू शकते. मात्र या नवीन रंगांच्या वापरामुळे किती फरक पडेल ही येणारी वेळच सांगू शकेलं. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 



दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी पाहा एबीपी माझा लाईव्ह