Mumbai News : राज्य सरकारकडून (Maharashtra Government) मुंबईतील (Mumbai) विकासकामांना (Development) वेग आला आहे. आगामी पालिका निवडणुका (BMC Election) लक्षात घेता सरकारच्या कामाला गती आली आहे. सरकार विविध उपाययोजना राबवताना दिसत आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते विविध विकासकामांची पायाभरणी आणि भूमीपूजन करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM  Devendra Fadnavis) यांच्या हस्ते आज मुंबई सुशोभीकरणाच्या (Mumbai Development) विविध कामांचा भूमीपूजन सोहळा पार पडणार आहे. 


मुंबई सुशोभीकरणाच्या 320 कामांचा शुभारंभ


बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (Brihanmumbai Municipal Corporation) वतीने मुंबई सुशोभीकरणाच्या 320 कामांचा शुभारंभ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते पार पडणार आहे. यामध्ये मुंबईतील रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण अंतर्गत, एकूण 52 किलोमीटर लांबी असलेल्या 11 रस्त्यांच्या कामांचा शुभारंभ करण्यात येणार आहे. टिळक नगर, नेहरु नगर आणि सहकार नगर येथील मलनिस्सारण वाहिन्या कामांचे भूमिपूजनही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. आज लोकमान्य टिळक क्रीडांगण चेंबूर येथे हा कार्यक्रम पार होणार आहे.


पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विकासकामांचा धडाका


मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईमधील विकासकामांच्या उद्घाटनाचा धडाका लावला आहे. मुंबई उपनगरात आज होणाऱ्या या कार्यक्रमाचं निवडणुकीच्या दृष्टीनं फार महत्त्व आहे. या कार्यक्रमाला मुंबई शहर पालकमंत्री दीपक केसरकर, पर्यटन आणि महिला आणि बालविकास मुंबई उपनगर पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, खासदार पूनम महाजन, आमदार मंगेश कुडाळकर या मान्यवरांची उपस्थिती पाहायला मिळणार आहे. 


शिंदे-फडणवीस सरकारकडून ताकद दाखविण्याचा प्रयत्न


महानगरपालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्या अध्यक्षतेखाली हा भूमीपूजनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. मुंबई पालिका निवडणुकीच्या दृष्टीने या कार्यक्रमातून शिंदे-फडणवीस सरकार त्यांची ताकद दाखवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. कार्यक्रमस्थळी जोरदार तयारी सुरु आहे. नागरिकांसाठी सुमारे दोन हजार खुर्च्या लावण्यात आल्या आहेत. भव्य दिव्य मंडप, ईलईडी स्क्रिन, शेकडो बॅनर्स ठिकाणी लावण्यात आले आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने मुख्यमंत्री आणि उपमुखमंत्री या कार्यक्रमात काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Maharashtra Police :  पोलिसांना लालफितीचा फटका! बढतीसाठी पोलीस अधिकारी ताटकळले, काहींना निवृत्तीच्या दिवशी प्रमोशन