मुंबई : मुंबईमध्ये ड्रग्जचा नायनाट करणाऱ्या अंमली पदार्थ विरोधी पथकाला मोठं यश हाती लागला आहे. गेल्या पाच वर्षांपासून मुंबईमध्ये राहून दिवसा कपडे विकणारा आणि रात्रीच्या वेळेस ड्रग्ज विकणाऱ्या एका नायजेरियन नागरिकांना अंमली पदार्थविरोधी पथक वांद्रे युनिटने अटक केली आहे याचं नाव सेंट लॉरेन्स दादा वय 33 असे असून तो वाशी येथील पामबीच रोड येथील राहणारा आहे. 


सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे 2016 मध्ये इनोसेंट बिझनेस विजावर भारतात आला होता आणि येथे कपड्यांचा व्यवसाय करत असल्याचं त्याने दाखवलं होतं.  मात्र हा कपड्यांचा व्यवसाय फक्त नावापुरता होता. इनोसेंट सखरा काम रात्रीच्या अंधारात ड्रग्ज विकणे होतं.


26 ऑगस्ट रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक वांद्रे युनिटला इनोसेंट हा खार पश्चिम येथे कोकेन विकण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली त्यानुसार त्याने सापळा रचला. इनोसेंट ज्यावेळेस तेथे आला तेव्हा पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतली. त्याच्याकडे एक काळ्या रंगाची सॅकबॅग होती. ज्यामध्ये पोलिसांना 1 किलो 300 ग्राम वजनाचे उत्तम प्रतीचे कोकेन सापडले. ज्याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात 3 कोटी 90 लाख रुपये होती.






अंमली पदार्थ विरोधी पथकाने जेव्हा इनोसेंटची चौकशी केली तेव्हा काही धक्कादायक बाबी समोर आल्या. मुंबई शहरात व उपनगर परिसरात उच्चभ्रू वस्तीमध्ये आणि विशेष करून किशोरवयीन मुलांना हे कोकीन विकायचा आणि तरुण पिढीला ड्रग्जच्या आहारी ढकलायचा. 


इनोसेंट हा एकटा नसून त्याच्याबरोबर एक मोठी आंतरराष्ट्रीय टोळी अमली पदार्थाच्या तस्करीमध्ये सक्रिय असण्याची शक्यता आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलिस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी वर्तवली आहे. तसेच यामध्ये अनेक नायजेरियन नागरिक सहभागी असण्याची शक्यता आहे. सदरची कारवाई पोलीस सहआयुक्त पुणे मिलिंद भारंबे, अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे विरेश प्रभू, पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप काळे यांच्या आदेशानुसार तसेच अंमली पदार्थ विरोधी पथक वांद्रे युनिटचे प्रभारी पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांच्या  नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशांत बंडगर, सुरेश भोये, पोलीस उपनिरीक्षक शंकर पोवळे, पोलीस नाईक मांढरे, सौंदाणे, पोलीस शिपाई खारे, केंद्रे, राठोड, शेडगे,निमगिरे आणि पोलीस नाईक राणे या पथकाद्वारे बजावण्यात आली आहे.