मुंबई : तुम्हाला मुंबईत घर घ्यायचं आहे? पण पैसे आणि जागा यांचं गणित जुळत नाही का? चेंबुरमधला नॅनो फ्लॅट बघून नक्कीच तुम्ही चक्रावून जाल.
लॅव्हिश फर्निचर... हॉल अटॅच किचन... किंग साईझ बेड... सोबत फाईव्ह स्टार हॉटेल्ससारख्या सुविधा... आणि हे सगळं फक्त 250 स्क्वेअर फुटात!
मुंबईतील कमी होत चाललेल्या जागांच्या प्रश्नावर एग्झर्बियाने एक भन्नाट आयडिया शोधून काढली आहे. चेंबुर सेंट्रलमध्ये होणाऱ्या या नॅनो घरांची कल्पनाच विलक्षण आहे.
मुंबईच्या वेगाशी वेग जुळवू पाहणाऱ्यांसाठी हा आसरा आहे. या नॅनो घरांच्या किमतीपेक्षा सुविधांमुळे ग्राहकांचा चांगलाच प्रतिसादही मिळत आहे.
एकीकडे मुंबईत येणारे लोंढे, त्यामुळे जागेविना होणारी माणसांची परवड आणि लाखात गेलेली स्क्वेअर फुटांची गणितं... त्यामुळे अशा नॅनो घरांची मुंबईला गरज आहे.