Mumbai Gokhale Bridge : मुंबईच्या अंधेरी पूर्व पश्चिमेला जोडणारा गोखले ब्रिज धोकादायक झाल्याने हा ब्रिज वाहतुकीसाठी दोन दिवसांपूर्वी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. या ब्रिजच्या कामाला सुरुवात झाल्यानंतर मुंबई महापालिका आणि पश्चिम रेल्वे गोखले ब्रिजचा रेल्वे लाइन वरून जाणारा भाग पाडण्याचा काम एकमेकांवर ढकलत असल्याचा पाहायला मिळतंय...एकीकडे गोखले ब्रिज बंद झाल्यामुळे नागरिकांना होणारा वाहतूक कोंडीचा त्रास आणि त्यात बीएमसी आणि पश्चिम रेलवेचा ब्रिज पाण्यावरून समन्वयाचा अभावामुळे होणारा विलंब... यात मार्ग कसा काढणार ?  


अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा पश्चिम उपनगरातील वाहतुकीच्या दृष्टीने गोखले ब्रिज महत्त्वाचा आहे. जो लोकांना आठवडाभर आधी पूर्वकल्पना देऊन दोन दिवसापूर्वी बंद करण्यात आला. आणि नागरिकांना वाहतूक कोंडीत ढकलल्यानंतर मुंबई महापालिका आणि पश्चिम रेल्वे प्रशासन या ब्रिजच्या रेल्वे लाईन वरील भाग कोण पाडणार ? यावर तू तू मे मे करायला सुरुवात झाली. गोखले ब्रिज बंद करत असताना मुंबई महापालिकेने या ब्रिज चा पश्चिम रेल्वे लाईन वरील भाग पाडण्याची तयारी करावी या आशयाचे पत्र पश्चिम रेल्वे प्रशासनाला दिला. त्यावर या संपूर्ण ब्रिज पाड काम हे मुंबई महापालिका करणार असल्याचं रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले... शिवाय हा जोपर्यंत भाग पाडला जात नाही तोपर्यंत पूर्ण ब्रिजचं काम तातडीने होऊ शकत नाही... त्यामुळे आधी ब्रिज बंद करून लोकांना वाहतूक कोंडीत ढकलायचं आणि त्यानंतर ब्रिज कोण पाडणार ? यावर काम एकमेकांवर ढकलायचं म्हणजे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे... आता यावर आम्ही मुंबई महापालिकेची बाजू अतिरिक्त आयुक्तांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी उत्तर देण्यास थेट नकार दिला.


कोणता नेमका भाग रेलवे लाइन वरती आहे? लोकांना होणारा त्रास बघून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेतली. या संदर्भात आम्ही  लोकप्रतिनिधींना विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी सुद्धा कुठलीच प्रतिक्रिया दिली नाही. फक्त या गोखले ब्रिजच्या रस्त्यावर ठिकठिकाणी प्रशासनाने पाच पर्याय मार्ग लावून मुंबईकरांना वाहतूक कोंडी ढकलले. आता हा त्रास कमीत कमी पुढील दोन वर्ष मुंबईकरांना सहन करावा लागणार आहे. आता या  लोकांना होणारा वाहतूक कोंडीचा त्रास बघून मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेत मुंबई महापालिका आयुक्त आणि पश्चिम रेल्वे अधिकारी यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा करून तातडीने काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्याशिवाय वाहतूक कोंडीवर पर्याय काढण्याचा सुद्धा सांगितलं...


त्यामुळे गोखले ब्रिज काम पूर्ण करण्यासाठी मुंबई महापालिका त्यासोबत पश्चिम रेल्वे प्रशासनाने योग्य समन्वय साधने आवश्यक आहे. अन्यथा या सगळ्या कामाला अधिकाधिक विलंब लागू शकतो आणि आणि या विलंबामुळे मुंबईकरांचा वाहतूक कोंडीतला त्रास सुद्धा तितकाच वाढणार आहे. त्यामुळे यावर कुठला पर्याय काढला जातो हे बघावं लागेल मात्र तूर्तास तरी मुंबईकरांना या ठिकाणाहून वाहतूक कोंडीतूनच मार्गस्थ व्हावे लागेल.