मुंबई  :  कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत घरीच केल्या जाणाऱ्या अँटीजेन चाचणी किटच्या मागणीत झालेली तीव्र वाढ आरोग्य विभागासाठी चिंतेचे कारण बनले आहे. पालिका अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार अशा अनेक पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद होत नसेल. कारण पॉझिटिव्ह व्यक्ती संबंधित एजन्सींना त्याची माहिती देत नाहीत. मुंबईत हजारो कोविड सेल्फ टेस्टचे अहवाल असे आहेत, ज्यांची नोंद झालेली नाही. असे अहवाल पालिकेला मिळत नसल्याने रुग्णांचा नेमका आकडा समजत नाही.  त्यामुळे आता घरगुती चाचण्या किंवा रॅपिड अँटीजन संच उत्पादक, विक्रेते यांना संचाच्या विक्रीबाबतचे तपशील पालिकेला देणे आता बंधनकारक असणार आहे. पालिकेने या संचाच्या वापराबाबतची नियमावली  जाहीर केली आहे. 


काय आहे ही नियमावली? 



  • घरगुती किंवा रॅपिड अन्टीजन चाचण्यांचा वापर वाढला असून याचे अहवाल मात्र वापरणाऱ्यामार्फत संबंधित यंत्रणेला दिले जात नाहीत . त्यामुळे आता वापरकर्त्यांचा पाठपुरावा करणारी यंत्रणा पालिकेने सुरू केली आहे.

  • नव्या नियमावलीनुसार, या चाचण्यांचे संच उत्पादन करणाऱ्या कंपन्या, औषध विक्रते किंवा वितरक यांना संच विक्री केलेल्यांची तपशीलवार माहिती पालिकेने दिलेल्या ईमेल आयडीवर दररोज द्यावी लागणार आहे.

  • केमिस्ट/फार्मसी/मेडिकल स्टोअर दवाखाने ग्राहकांना विकल्या गेलेल्या होम टेस्टिंग अँटीजेन किटचा तपशील 'बी' फॉर्ममध्ये आयुक्त, FDA यांना ईमेल आयडी whogmp.mahafda@gmail.com वर तसेच MCGM च्या एपिडेमियोलॉजी सेलला ईमेल आयडीवर द्यावा . mcgm.hometests@gmail.com.

  • केमिस्ट/फार्मसी/मेडिकल स्टोअर/ दवाखाने होम टेस्टिंग अँटीजेन किट्सच्या खरेदीदाराला बिल जारी करतील आणि ज्या ग्राहकांना होम टेस्टिंग अँटीजेन किट्स विकल्या जातात त्यांची नोंद ठेवावी

  • आयुक्त, FDA हे मुंबईतील खरेदार नागरिक सर्व केमिस्ट/फार्मसी/मेडिकल स्टोअर्स आणि वितरकांच्या होम टेस्टिंग अँटीजेन किट्सच्या वितरण आणि विक्रीवर देखरेख ठेवतील.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha



महत्त्वाच्या बातम्या :