Dr. Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Din Special Local :  भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर अभिवादन करता येणार आहे. कोरोनासंबंधित नियमांचं पालन करुन चैत्यभूमीवर येण्याची परवानगी देण्यात आली आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त 6 डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - कल्याण आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -पनवेल स्थानकांदरम्यान मध्य रेल्वे प्रवाशांकरीता 8 उपनगरीय विशेष गाड्या (Mumbai Local) चालवण्यात येणार आहेत.  या उपनगरीय विशेष गाड्या सर्व स्थानकांवर थांबतील.

  


विशेष लोकलचं वेळापत्रक असं असेल 
 मेन लाईन - अप विशेष:  
• कल्याण- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - विशेष कल्याण येथून 1 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे 2.30 वाजता पोहोचेल. 
• कल्याण- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष कल्याण येथून 2.15 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे 3.45 वाजता पोहोचेल.


 मेन लाईन - डाउन विशेष:
 • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - कल्याण विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 1.30 वाजता सुटेल आणि कल्याण येथे 3.00 वाजता पोहोचेल.  
• छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - कल्याण विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 2.30 वाजता सुटेल आणि कल्याण येथे 4 वाजता  पोहोचेल.


 हार्बर लाइन - अप विशेष:
 • पनवेल- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष पनवेल येथून 1.15 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे 2.30 वाजता पोहोचेल.  
• पनवेल- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष पनवेल येथून 2.30 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे  3.50 वाजता पोहोचेल.


 हार्बर लाइन - डाउन विशेष:
• छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - पनवेल विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 1.40 वाजता सुटेल आणि पनवेल येथे 3.00 वाजता पोहोचेल.  
• छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - पनवेल विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 2.40 वाजता सुटेल आणि पनवेल येथे 4.00 वाजता  पोहोचेल.   


प्रवाशांनी ट्रेनमध्ये चढताना, प्रवास करताना आणि उतरताना कोविड-19 नियमांचे पालन करण्याचं आवाहन रेल्वे प्रशासनानं केलं आहे. तसेच गैरसोय टाळण्यासाठी प्रवाशांनी योग्य तिकीट काढून प्रवास करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.