मुंबई : मुंबई शहरात गॅस्ट्रोची मोठी साथ पसरल्याची माहिती आहे. पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे पसरणाऱ्या गॅस्ट्रो म्हणजेच अतिसाराच्या आजाराने भर उन्हाळ्यात डोकं वर काढलं आहे. मुंबईत जानेवारी ते एप्रिल दरम्यान गॅस्ट्रोचे 2 हजार 280 रुग्ण आढळले आहेत.
एप्रिल महिन्यातच गॅस्ट्रोचे सर्वाधिक म्हणजे 916 रुग्ण आढळले आहेत. रस्त्यांवरील खाद्यपदार्थ आणि सरबतासाठी वापरल्या जाणाऱ्या दूषित पाणी आणि बर्फामुळे गॅस्ट्रोचे रुग्ण वाढल्याचा अंदाज आहे. गॅस्ट्रोचे सर्वाधिक रुग्ण कुर्ल्यात आढळल्याची माहिती आहे.
विविध आजारांना कारणीभूत ठरणाऱ्या रस्त्यांवरील खाद्यपदार्थांच्या गाड्यांविरोधातली मोहीम तीव्र करण्याचे निर्देश पालिका आयुक्त अजॉय मेहता यांनी दिले आहेत.
विभागनिहाय गॅस्ट्रोच्या रुग्णांची आकडेवारी
कुर्ला (एल-वॉर्ड)- 207
गोवंडी, चेंबूर (एम-पूर्व)- 97
घाटकोपर (एन) - 92
मालाड (पी-उत्तर) - 79
वांद्रे (एच-पूर्व) - 70
देवनार (एम-पश्चिम) - 64
दहिसर (आर-उत्तर) - 48
वांद्रे, खार (एच-पश्चिम) - 34