मुंबई : मुंबईतील सीएसटी अर्थात छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि एलफिन्स्टन रोड या रेल्वे स्टेशनचं नाव लवकरच बदलणार आहे. नामांतराच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे.
एलफिन्स्टन रोडऐवजी 'प्रभादेवी' तर छत्रपती शिवाजी टर्मिनसऐवजी आता 'छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस' असं नामकरण होणार आहे.
1991 साली दिवाकर रावते महापौर असतांना मुंबई महापालिका सभागृहात पहिल्यांदा हा नामांतराचा ठराव मांडण्यात आला होता. तेव्हापासून सुरु असलेल्या पाठपुराव्याला दोन दशकांनंतर यश आलं आहे.
काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने नामांतराचा प्रस्ताव मंजूर केला होता. त्यानंतर याची आता प्रत्यक्ष अंमलबजावणी होणार आहे.