मुंबई : मुंबईतील तीनही रेल्वेमार्गांवर आज मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. दुरुस्तीच्या कामांसाठी हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि हार्बर मार्गावर आज 7 मे रोजी विशेष मेगाब्ल़ॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड डाऊन फास्ट मार्गावर, पश्चिम रेल्वेमार्गावर माहीम ते सांताक्रुझ फास्ट अप आणि डाऊन मार्गांवर तसंच हार्बर मार्गावर सीएसटी ते चुनाभट्टी आणि वांद्रे स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गांवर दुरुस्तीच्या कारणामुळे मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
मध्य रेल्वे
मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान सकाळी 10.15 ते दुपारी 3.15 वाजेपर्यंत दुरुस्तीची कामं करण्यात येणार आहेत. मेगाब्लॉकच्या काळात माटुंगा ते मुलुंड दरम्यानची डाऊन फास्ट मार्गावरील वाहतूक सकाळी 9.38 ते दुपारी 2.54 वाजेपर्यंत डाऊन स्लो मार्गावरुन वळवण्यात आली आहे. या मार्गावरील लोकल निर्धारित वेळेपेक्षा 20 मिनिटं उशिरानं धावतील.
अप फास्ट मार्गावरील लोकल सकाळी 10.46 ते दुपारी 3.18 या वेळेत मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर आणि कुर्ला या स्थानकांत थांबतील. त्यामुळे सर्व लोकल्स 15 मिनिटं उशिरानं धावतील.
ब्लॉकदरम्यान सीएसटीला येणाऱ्या आणि जाणाऱ्या स्लो मार्गांवरील सर्व लोकल सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 10 मिनिटे उशिराने धावतील.
सीएसटी आणि दादरहून सुटणाऱ्या सर्व लांब पल्ल्याच्या ट्रेन मांटुगा ते मुलुंड दरम्यान डाऊन स्लो मार्गावरून चालवण्यात येणार असल्यामुळे त्या 30 मिनिटे उशिराने धावतील.
हार्बर रेल्वे
हार्बर मार्गावर सीएसटी ते चुनाभट्टी आणि वांद्रे स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर दुरुस्ती कामांसाठी सकाळी 11.10 ते दुपारी 4.40 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
सकाळी 9.52 ते दुपारी 4.39 वाजेपर्यंत सीएसटी ते चुनाभट्टी दरम्यानची अप आणि डाऊन मार्गांवरील वाहतूक पूर्णपणे बंद राहील, त्यामुळे वाशी, बेलापूर आणि पनवेलसाठी लोकल धावणार नाहीत.
सीएसटी ते वांद्रे-अंधेरी दरम्यानची अप आणि डाऊन मार्गावरील वाहतूक सकाळी 10.38 ते दुपारी 4.13 वाजेपर्यंत बंद राहील.
प्रवाशांच्या सोयीसाठी कुर्ला प्लॅटफॉर्म क्र. 8 वरुन पनवेलकरिता विशेष लोकल सोडण्यात येईल.
रविवारी हार्बर मार्गावरील प्रवासी मेन लाईन आणि पश्चिम रेल्वे मार्गावरून सकाळी 10 ते संध्याकाळी 6 या वेळेत प्रवास करु शकतात.
पश्चिम रेल्वे
आज रविवारी सांताक्रूझ ते माहीम स्थानकांदरम्यान जम्बोब्लॉक सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 वाजेपर्यंत अप आणि डाऊन जलद मार्गावर दुरुस्तीकामं करण्यात येणार आहे.
ब्लॉकदरम्यान अप आणि डाऊन फास्ट मार्गावरील वाहतूक सांताक्रुझ ते माहीमदरम्यान अप आणि डाऊन स्लो मार्गावरून चालवण्यात येईल.
उपनगरीय मार्गावरील काही लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.