मुंबई : मुंबईत मध्य रेल्वेवर उद्यापासून लोकलच्या 18 अतिरिक्त फेऱ्या सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.


रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी घोषणा केल्याप्रमाणे मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर 1 ऑक्टोबरपासून 28 नवीन फेऱ्या सुरु करण्यात आल्या आहेत. आता मध्य रेल्वेच्या मेनलाईनवर 16 ऐवजी 18 नव्या फेऱ्या चालवण्यात येणार आहेत.

एकूण 25 नवीन फेऱ्यांना वेळापत्रकात जागा दिली असून त्यातील सात फेऱ्या रद्द करुन 18 फेऱ्या चालतील, असं मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी सांगितलं. रात्री ब्लॉकसाठी वेळ मिळावा म्हणून शेवटची कर्जत लोकल दहा मिनिटं आधी सोडण्यात येणार आहे.

कर्जत आणि कसाऱ्याहून सकाळच्या पिक अवरमध्ये 8.45 च्या बदलापूर आणि 8.05 च्या टिटवाळा लोकलचे शेवटचे तीन डबे महिलांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. तर दिवा स्थानकात जलद लोकलच्या थांब्यांची संख्या 24 वरुन 46 वर नेण्याती आली आहे.

सीएसएमटीहून सुटणारी शेवटची कर्जत लोकल आता रात्री 12.30 ऐवजी दहा मिनिटं आधी म्हणजे 12 वाजून 20 मिनिटांनी सुटणार आहे. त्यामुळे रात्री उशिरा कामावरुन सुटणाऱ्या नागरिकांची काहीशी धावपळ होण्याची शक्यता आहे.

कसाराहून रात्री 10.35 वाजता सीएसएमटीसाठी सुटणारी लोकल आता अर्धा तास आधीच म्हणजे 10 वाजून 5 मिनिटांनी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे नाशिक, इगतपुरी भागातून मुंबई, कल्याण, ठाण्यात येणाऱ्या प्रवाशांना आता लवकर यावं लागेल.

या लोकलचे कल्याण दिशेकडील तीन डबे महिलांचे

टिटवाळाहून सकाळी 8 वा 10 मिनिटांनी सुटणार – दादरला सकाळी 9 वा 37 मिनिटांनी पोहचणार
बदलापूरहून सकाळी 8 वा 45 मिनिटांनी सुटणार – दादरला सकाळी 9 वा 55 मिनिटांनी पोहचणार

डाऊन मार्गावरील शेवटच्या लोकल

सीएसएमटी-कर्जत रात्री 12.30 ऐवजी 12.20 वाजता सुटेल
सीएसएमटी-ठाणे रात्री 12.34 ऐवजी 12.31 वाजता सुटेल
कुर्ला-ठाणे रात्री 1.02 ऐवजी 12.56 वाजता सुटेल
ठाणे-कल्याण रात्री 1.24 ऐवजी 1.19 वाजता सुटेल
कल्याण-कर्जत रात्री 1.57 ऐवजी 1.52 वाजता सुटेल

अप मार्गावरील पहिली लोकल

कसारा-आसनगाव रात्री 10.35 ऐवजी 10.05 वाजता सुटेल
आसनगाव-टिटवाळा रात्री 11.32 ऐवजी 11.08 वाजता सुटेल
टिटवाळा-कल्याण रात्री 11.53 ऐवजी 11.29 वाजता सुटेल
बदलापूर-कल्याण रात्री 11.50 ऐवजी 11.31 वाजता सुटेल
कल्याण-सीएसएमटी रात्री 12.11 ऐवजी 11.52 वाजता सुटेल