मागील काही दिवसांपासून सुरु असलेलं मनसेचं आंदोलन आणि त्यानंतर पालिकेनं फेरीवाल्यांवर सुरु केलेली कारवाई, याविरोधात डोंबिवलीतले फेरीवाले एकवटले असून त्यांनी आज (मंगळवार) मेळावा घेतला.
या मेळाव्यात त्यांनी मनसेच्या नगरसेवकांवरच सनसनाटी आरोप केले. ‘डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या परिसरात आधी मनसेचे नगरसेवक राहुल चितळे आणि आता विद्यमान विरोधी पक्षनेते मंदार हळबे हे फेरीवाल्यांकडून हप्ते घेतात. याबाबतचे पुरावेही आपल्याकडे उपलब्ध असून राज ठाकरे हे त्यांच्या नगरसेवकांवर आता कारवाई करणार का?’ असा सवाल विचारत फेरीवाल्यांनी आता मनसेला आव्हान दिलं आहे.
दरम्यान, यावेळी त्यांनी पालिकेतील फेरीवाला विरोधी पथकावरही त्यांनी टिका केली. या पथकात नेमणूक होण्यासाठी पालिकेत एक ते दीड लाखाचा रेट सुरु असल्याचं त्यांनी सांगितलं. कारण खालपासून वरपर्यंत सगळेच फेरीवाल्यांकडून हप्ते घेतात. असा आरोप फेरीवाल्यांचा आहे.
दुसरीकडे या आरोपांनंतर केडीएमसीतील मनसेचे विरोधी पक्षनेते मंदार हळबे यांनी मात्र हे सारे आरोप फेटाळून लावले आहेत.
मनसेचं आंदोलन
एलफिन्स्टन दुर्घटनेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अनधिकृत फेरीवाल्यांना हटवण्याची मागणी रेल्वे आणि प्रशासनाकडे केली होती. त्यासाठी त्यांनी 15 दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. मात्र तरीही फेरीवाले न हटल्याने मनसे कार्यकर्ते मुंबईसह उपनगरातील फेरीवाल्यांना हुसकावून लावत आहेत.
संबंधित बातम्या :
निरुपमांच्या घराबाहेर भाज्यांच्या गाड्या लावून मनसेचं आंदोलन
अवैध फेरीवाल्यांना हटवणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांची धरपकड सुरु
जैसी करनी, वैसी भरनी, संजय निरुपम यांचं मनसेला प्रत्युत्तर
राज ठाकरेंनी घेतली मनसे विभाग अध्यक्ष सुशांत माळवदेंच्या भेट
… तर तुम्हालाही मार खावाच लागणार : संजय निरुपम
मनसे नेते संदीप देशपांडे पोलिसांच्या ताब्यात
दादरमध्ये मनसेकडून फेरीवाल्यांच्या स्टॉलची तोडफोड
मालाडमध्ये फेरीवाल्यांचा मनसे कार्यकर्त्यांवर जीवघेणा हल्ला
फेरीवाल्यांचा मनसे कार्यकर्त्यांवर जीवघेणा हल्ला, आतापर्यंत काय काय झालं?
नितेश राणेंचा मराठी ‘स्वाभिमान’ जागा, मनसेला पाठिंबा