मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा शिवाजी पार्कवर होणारा यंदाचा गुढीपाडवा मेळावा रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे मनसेचा गुढीपाडवा मेळावा यंदा भव्य स्वरुपात साजरा न होता स्थानिक पातळीवरच साजरा होणार आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित राहणार नसल्याने शिवाजी पार्कवर होणारा गुढीपाडवा मेळावा रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी स्थानिक पातळीवरच गुढीपाडवा मेळावा साजरा करावा असं पक्षातर्फे सांगण्यात आलं आहे.
गुढीपाडव्याला राजकीय पक्ष गुढीपाडव्याला शोभायात्रा काढतात. यामध्ये शिवसेना आणि मनसे आघाडीवर असतात.
दोन वर्षांपूर्वी मनसेने गुढीपाडवा मेळाव्याला सुरुवात केली होती. परंतु राज ठाकरे यांच्या अनुपस्थितीमुळे यंदा हा मेळावा रद्द करण्यात आला आहे.