मुंबई :  शिवसेना दसरा मेळाव्यानंतर मनसेनं सेनाभवनासमोर पोस्टरबाजी केली आहे. अयोध्येला वारीसाठी शुभेच्छा, पण राज्यातील काही गंभीर प्रश्नाबाबत काय? असं पोस्टर शिवसेना भवनसमोर लावण्यात आलंय. शिवसेनेच्या दसरा मेळावा कार्यक्रमात शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपण 25 नोव्हेंबरला अयोध्येत जाणार असल्याचं जाहीर केलं आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राम मंदिराबाबत आतापर्यंत जे प्रश्न विचारलेत, तेच प्रश्न आता अयोध्येत जाऊन विचारणार आहे, असंही ते म्हणाले. याच पार्श्वभूमीवर मनसेने शिवसेनेला अयोध्येला वारीसाठी शुभेच्छा पण राज्यातील काही गंभीर प्रश्नाबाबत काय? थेट प्रश्ना केला आहे. मनसेने शिवसेनेला विचारलेले प्रश्न महाराष्ट्राचे रस्ते खड्डे मुक्त होणार का? महागाई कमी होणार का? महाराष्ट्रात महिला सुरक्षित राहणार का? बेरोजगारांना रोजगार मिळणार का? शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार का? शेती मालाला हमी भाव मिळणार का? महाराष्ट्रातला दुष्काळ संपणार का? मोकळ्या जागांवरील अतिक्रमण थांबणार का? महापालिकेतील भ्रष्टाचार संपणार का? खिशातले राजीनामे बाहेर पडणार का?